शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लातूरमध्ये ५५ गावांत ४३७ रिचार्ज शाफ्टद्वारे जलपुनर्भरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 03:21 IST

पाणीपातळीत वाढ होण्यासाठी अभिनव उपक्रम

- संदीप शिंदेलातूर : पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्यासाठी जिल्ह्यातील ५५ गावांत ४३७ ठिकाणी ‘रिचार्ज शाफ्ट’चा उपक्रम राबविण्यात आला. परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ५५ गावांत ‘रिचार्ज शाफ्ट’ उपक्रमामुळे जलपुनर्भरणास मदतझाली आहे.सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत, विंधन विहिरींची घनता जास्त असलेला भाग, भूजलाचा वाढता उपसा असलेले क्षेत्र तसेच पाणी पातळी घटलेला भाग आदी ठिकाणी भूजल सर्वेक्षण विभागाने उपक्रम राबविला होता. त्यासाठी जिल्ह्यातील ५५ गावांतील ४३७ ठिकाणाची निवड करण्यात आली होती. जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या ९० टक्के पाऊस झाला. परिणामी, नदी, नाले, बंधारे, लघु, मध्यम प्रकल्पात पाणीसाठा झाला आहे.एक शाफ्ट पाच वर्षे काम करणारएक रिचार्ज शाफ्टचे काम योग्य पद्धतीने झाल्यास पाच वर्षासाठी ते काम करते. या उपाययोजनेस अत्यंत अल्पस्वरूपाच्या देखभालीची गरज असते. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून खोदण्यात आलेल्या नदी, बंधारे तसेच सार्वजनिक पिण्याच्या जलस्रोताजवळ शाफ्टची उभारणी करता येते. या प्रयोगामुळे जलसंवर्धनाचा उपक्रम यशस्वी झाला आहे. भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे शक्य झाले आहे. गावस्तरावर नागरिकांच्या सहकायार्मुळे रिचार्ज शाफ्टची संकल्पना भविष्यात सर्वच गावात राबविली जाणार आहे.जलपुनर्भरणाच्या उपक्रमामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई दूर होईल. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. - डॉ. भालचंद्र संगनवार,वरिष्ठ भू वैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विभाग