शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गावांनी कर भरणा केला अन् राज्यास दिशादर्शक ठरला!

By हरी मोकाशे | Updated: February 25, 2023 16:16 IST

'अभिनव' कर वसुली दिन : ग्रामपंचायतींच्या स्वउत्पन्नात वाढ

- हरी मोकाशेलातूर : घरपट्टी, नळपट्टी मागणे म्हणजे कुठल्याही गावात वादाची ठेणगी टाकणेच. त्यामुळे वसुली मोहीम तर दूरच. मात्र, जिल्हा परिषदेच्या सीईओंनी 'अभिनव' संकल्पना राबवित गेल्या वर्षीपासून विशेष कर वसुली दिन राबविण्यास सुरुवात केली. त्यामुळे यंदाच्या वर्षात जिल्ह्यात जवळपास ८५ टक्क्यापेंक्षा अधिक कर वसुली झाली आहे. या नाविण्यपूर्ण उपक्रमाची राज्यातील इतर जिल्हा परिषदांनी दखल घेत तिथे सुरुवात केली आहे. त्यामुळे ही मोहीम राज्यासाठी दिशादर्शकच ठरली आहे.

कुठल्याही गावचे बहुतांश नागरिक घरपट्टी, पाणीपट्टी भरण्यास उत्सुक नसतात. त्यामुळे गावात ग्रामपंचायतीस नवीन विकास कामे सुरु करण्यास अडचणी येतात. बहुतांश वेळेस ग्रामपंचायतीचा कुठलाही दाखला देताना कर भरण्यासाठी सूचना केल्या जातात. तेव्हा तडजोड करीत काहीजण थोडाफार भरणा करतात. प्रत्येकाची कर भरण्याची मानसिकता व्हावी म्हणून जिल्हा परिषदेचे सीईओ अभिनव गोयल यांनी गेल्या वर्षीपासून विशेष कर वसुली दिन सुरु केला.

मोहिमेस सुरुवातीस जिल्ह्यातील ७८६ पैकी काही गावांत अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र, ग्रामपंचायतींचे स्वउत्पन्न वाढविल्याशिवाय गावात काही नवीन उपक्रम राबविणे शक्य नाही. तसेच शासनाच्याच निधीवर अवलंबून राहिल्यास गावचा विकास साधता येणार नाही, हे जिल्हा परिषदेच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी पटवून दिले. नागरिकांनीही महत्त्व जाणून कराच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना आर्थिक बळ देण्यास सुरुवात केली.

५४ कोटींपैकी ४४ कोटींचा भरणा...जिल्ह्यातील ७८६ ग्रामपंचायतींकडे घरपट्टीपोटी २० कोटी ७४ हजार ६४० तर पाणीपट्टीपोटी ३३ कोटी ६० लाख ५८ हजार असा एकूण ५४ कोटी ३५ लाख २४ हजारांचा कर भरणा अपेक्षित आहे. आतापर्यंत ४४ कोटी ८९ लाख १७ हजारांची वसुली झाली आहे. विशेष म्हणजे, गुरुवारी एकाच दिवसात ४ कोटी २० लाख ५५ हजारांचा नागरिकांनी भरणा केला.

राज्यातील जिल्ह्यांनी सुरु केला उपक्रम...लातूर जिल्हा परिषदेचा हा विशेष कर वसुलीचा यशस्वी उपक्रम राज्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, उस्मानाबाद, सोलापूर व अन्य काही जिल्ह्यांनी सुरु केला आहे. त्यामुळे तो संपूर्ण राज्यासाठी पथदर्शी ठरत आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील नागरिक आता स्वत:हून कर भरणा करीत आहेत.

टॅग्स :laturलातूरTaxकर