...
जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण
चाकूर : येथील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेत मुख्याध्यापिका सुजाता चात्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी नागनाथ कदम, सचिन अंबुलगे, गणेश पैजणे, वर्षा वाडकर, गोविंद कोडरुळ, विनायक पवार, एजाज पटेल, आशा बेगम शेख, तबिहा ताजे उपस्थित होते.
...
देशमुख कनिष्ठ महाविद्यालयात कार्यक्रम
चाकूर : येथील विलासराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे कोषाध्यक्ष रशीदसाहेब मासुलदार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी सचिव चाँदसाहेब मासुलदार, युनूससाहेब मासुलदार, ओसामा मासुलदार, पटेल महमद रसुल, प्रा. इसाबेग मंगरुळे, जलील शेख, वासंती नाकाडे, सुनीता घोगरे, हणमंत शिंदे, विठ्ठल पासमे, भास्कर साळुंके, उमर शेख, गणपत डोंगरे, सुमय्या तांबोळी उपस्थित होते.
...
लातूररोड शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम
चाकूर : लातूररोड येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक अनिल डावळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी चंद्रशेखर मिरजकर, प्रभाकर कांबळे, श्रीधर म्हेत्रे, शारदा अंतुरे- मिरजकर, सुरेखा मुर्गे, विश्वनाथ निला, मनोहर मेकले, अनुसया इंद्राळे, विजयालक्ष्मी स्वामी, हेमलता सुवर्णकार, मायावती येडले, छाया धुमाळ, सरपंच वसुंधरा मुंडे, माजी सरपंच मधुकरराव मुंडे, श्रीहरी मुंडे, पा. मा. वाघमारे उपस्थित होते.
...
लातूररोड ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण
चाकूर : लातूररोड येथील ग्रामपंचायतीत सरपंच वसुंधरा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी उपसरपंच अब्दुल शेख, माजी सरपंच मधुकरराव मुंडे, रेणुका पटणे, मैनाबाई भदाडे, अन्वरबी शेख, शीतल मस्के, रणजित मिरकले, राजेश्वर डुमणे, विलास देशमाने, नागनाथ कांबळे, पा. मा. वाघमारे, श्रीहरी मुंडे, जगन्नाथ मिरकले, पुंडलिक तेलंग, पाशामियाँ शेख, शंकर साबणे, भारत चात्रे, दयानंद वाघमारे उपस्थित होते.
...
घरणी ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण
चाकूर : घरणी येथील ग्रामपंचायतीत सरपंच भानुदासराव पोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी उपसरपंच संपत मानुरे, सुधाकर पोटे, शिवाजी शिंदे, शीलरत्न सावते, मारोती यंचेवाड, ग्रामसेवक तातेराव खाडे आदी उपस्थित होते. तसेच घरणी येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक माधवराव सोनटक्के यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी शिवहर स्वामी, प्रभावती पोतणे, प्रभावती मोतीपवळे, दिलीप मानखेडे, शिवकुमार मोरगे, किसन तळभोगे, बालाजी बेरकिळे, नीळंकठ भालेकर, सविता स्वामी, सुनीता नागरगोजे, रोहिणी बोडके, सरपंच भानुदासराव पोटे, दिलीप पाटील, रामदास बानापुरे आदींची उपस्थिती होती.