शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

लसीच्या तुटवड्याने लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढला; ६ वरून आता २४ गावांत लागण

By हणमंत गायकवाड | Updated: September 15, 2022 17:32 IST

लातूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १७६ जनावरे बाधित आढळली आहेत 

लातूर : लम्पी स्कीन डिसीजचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढत असून, सुरुवातीला ८७ जनावरे बाधित होती. आता १७६ जनावरांना या आजाराची लागण झाली आहे. शिवाय, लसींचाही तुटवडा जाणवत असून, १ लाख १६ हजार डोसेस जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून उपलब्ध केले जात आहेत. यातील ८० हजार डोसेस उद्यापर्यंत मिळण्याची शक्यता आहे. 

लम्पी स्कीन डिसीजचा प्रादुर्भाव गाय आणि बैल वर्गामध्ये वाढत आहे. म्हैस वर्गात त्या तुलनेत या आजाराचा प्रादुर्भाव नाही. त्यामुळे २ लाख ५५ हजार गाय व बैल वर्गातील पशुधनाला लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभाग पशुधनाला लस देण्यासाठी मेहनत घेत आहे. ज्या गावात पशुधनाला लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव झाला आहे, त्या गावात पाच कि.मी. अंतरापर्यंतच्या पशुधनाला लस दिली जात आहे. आतापर्यंत २३ हजार ३०० पशुधनाला लस देण्यात आली आहे. फिल्डवर ३७ हजार पशुधनाला लस देण्याची मोहीम पशुधन विभागाचे कर्मचारी राबवीत आहेत. 

गाय, बैल वर्गातील २ लाख ५५ हजार संख्या जिल्ह्यात गाय व बैल वर्गातील पशुधनाची संख्या २ लाख ५५ हजार आहे. ज्या गावामध्ये या आजाराचे पशुधन आढळले आहे, त्या गावाच्या पाच कि.मी. अंतरातील गाय व बैल वर्गातील पशुधनाला लस दिली जाणार आहे. १ लाख १६ हजार मात्रा उपलब्ध झाली असून, त्यातील ८० हजार डोसेस उद्यापर्यंत मिळणार आहेत. 

म्हैस वर्गाला लस नाही म्हैस वर्गातील पशुधनाची संख्याही २ लाख ५५ हजार असून, या वर्गामध्ये लम्पी स्कीन डिसीजचा प्रादुर्भाव नाही. त्यामुळे म्हैस वर्गाला लस दिली जाणार नसल्याचे पशुधन विभागाच्या वतीने सांगण्यात आले. 

या गावांत प्रादुर्भावलातूर तालुक्यातील गुंफावाडी, चिंचोली बल्लाळनाथ, मुरुड आदी गावांमध्ये लम्पी स्कीन डिसीजचे पशुधन आढळले आहेत. तसेच चिंचोली, हासोरी, कासार बालकुंदा, टाकळगाव, औसा, हाळी हंडरगुळी, उदगीर, निलंगा, सरवडी, कवठा आदी गावांमध्ये लम्पी स्कीन डिसीजचे पशुधन आढळले आहेत.

टॅग्स :laturलातूरagricultureशेती