ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आनंद कर्नावट, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नारायणराव देशमुख, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रत्नाकर तांदळे तसेच आशा स्वयंसेविका सुरेखा गिरी, निर्मला कांबळे व अंगणवाडी कार्यकर्ती कुसुम कराड यांना लस देण्यात आली. मंगळवार व रविवार वगळता इतर दिवशी लसीकरण केले जाणार आहे. लसीकरणापूर्वी संपूर्ण तपासणी करण्यात येत आहे. डॉ. रवींद्र भालेराव, अरुणा सोनार, सुनिता जाधव यांच्या पथकाने लस दिली. लसीकरणानंतर त्यांना जिल्हास्तरीय आरोग्य पथकाच्या निगराणीखाली अर्धा तास ठेवण्यात आले होते. यावेळी डॉ. संजय भोसले, डॉ. सईद शेख, डॉ. कल्लाप्पा हलकुुडे, डॉ. संध्या घोगरे, डॉ. शमीम शेख, डॉ. वैशाली बनसोडे, अनुराधा जIधव, शुभांगी सावंत, विनोद राठोड, परिचारिका लता नखाते, बी.सी. गिरी, मनीषा सिरसाट, मुक्ता सिरसाट, अनिता हलगरकर, विलास गिरी यांची उपस्थिती होती. लस घेतल्यानंतर कसलाच त्रास जाणवला नाही. लस अतिशय सुरक्षित असल्याचे अधीक्षक डॉ. आनंद कर्नावट, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नारायणराव देशमुख यांनी सांगितले.
रेणापुरात लसीकरण मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:22 IST