शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

शेतीकामांसाठी मिळेनात मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:14 IST

उदगीर : शेतीकामांसाठी मजुरी कमी अन् तीही वेळेवर नाही. तसेच शेतीतील कामे ही कष्टाची असल्याने ग्रामीण भागासह शहरातील शेतीकामांसाठी ...

उदगीर : शेतीकामांसाठी मजुरी कमी अन् तीही वेळेवर नाही. तसेच शेतीतील कामे ही कष्टाची असल्याने ग्रामीण भागासह शहरातील शेतीकामांसाठी दोन- चार वर्षांपासून मजुरांची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे ऐन राशीच्याच नव्हे, तर इतरवेळीही शेतकऱ्यांना शेतीसाठी मजुरांचा शोध घ्यावा लागत आहे. परिणामी, शेतीसाठी मजूर देता का मजूर अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय म्हणून गणला जातो. सध्या शेतीत नवनवीन प्रयोग करण्यात येत असले तरी शेती निसर्गावर अवलंबून आहे. शेतीकामे ही कष्टाची असल्याने सध्या मजूर ही कामे करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे पर्याय म्हणून शेतीसाठी विविध यंत्रांचा वापर केला जात आहे. त्यामुळे शेतीतील काही कामे सोपी झाली आहेत. परंतु, पिकांच्या काढणीसह अन्य काही कामांसाठी मजुरांची आवश्यकता भासते. त्यामुळे शेतकरी मजुरांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात करतात. मात्र, वेळेवर मजूर न मिळाल्याने शेतीकामे लांबणीवर टाकावी लागत आहेत.

विशेष म्हणजे, मागील काही वर्षांच्या तुलनेत सध्या मजुरीच्या दरात वाढ झाली आहे. परंतु, त्यापेक्षा अधिक दर बांधकाम क्षेत्रात मिळत असल्याने मजूर शेतीऐवजी अन्य क्षेत्राकडे वळले आहेत. परिणामी, शेतीकामासाठी येणाऱ्या मजुरांना आता वाहनांची सोयही करून द्यावी लागत आहे.

५ वर्षांपूर्वीचा दर...

पुरुष २५०/- रुपये

महिला १५०/- रुपये

यंदाचा दर...

पुरुष ४५० रुपये

महिला ३०० रुपये

यंत्राने होणारी कामे...

नांगरणी, कोळपणी, पेरणी, काढणी, रास

कृषी यंत्रांनी घेतली मजुरांची जागा...

ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी, कोळपणी, पेरणी केली जाते. तसेच आता ऊसतोडणीसाठीही यंत्र आले आहे. दिवसभरात जवळपास ६ एकरवरील उसाची तोडणी होते. सोयाबीन, तूर, हरभरा काढणी यंत्रेही उपलब्ध झाली आहेत. तसेच यंत्रावरच राशी केल्या जातात.

यंत्राद्वारे वेळेत बचत मात्र परवडत नाही...

सध्या निसर्गाचा समतोल बिघडत आहे. अवेळी वादळ, पाऊस होतो. अशावेळी यंत्राच्या सहाय्याने काढणी करणे शक्य होत नाही. ऐन काढणीवेळी सर्वच शेतकऱ्यांची धावपळ होते. तेव्हा मजूर मिळत नाहीत. अधिक दर देऊनही मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतीपिकांचे मोठे नुकसान होते. यंत्राने कामे करताना शेतकऱ्यांची तारांबळ उडते.

- भास्कर कुंडगीर, शेतकरी, इस्मालपूर.

अल्पभूधारक शेतकऱ्यांना मजूर मिळत नाहीत आणि यंत्राने शेती करणे परवडत नाही. कमी उत्पादन व वाढत्याच्या शेती खर्चामुळे ताळमेळ बसत नाही. त्यामुळे अनेकदा मेहनतही वाया जाते. परंतु, आगामी हंगाम पदरी पडेल, अशी शेतकऱ्यांची आशा असते.

- अनंत मुळे, शेतकरी, वाढवणा बु.

दिवसेंदिवस निसर्गाचे चक्र बिघडत असून शेतकऱ्यांना नेहमीच संकटाला सामोरे जावे लागते. त्यातच जनावरांसाठीच्या चाऱ्याचे भाव गगनाला भिडल्याने बैलबारदाणा ठेवणे शेतकऱ्यांना परवडणासे झाले आहे. ऐनवेळी मजूर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अधिक दर द्यावा लागतो. पेरणीपासून ते राशीपर्यंतची कामे यंत्राने करावी लागत आहेत.

- देवीदास केदार, शेतकरी, देऊळवाडी.