शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Latur: तपघाले खून प्रकरणातील दोषी पोलिसांना सेवेतूनच बडतर्फ करा, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी

By हणमंत गायकवाड | Updated: June 15, 2023 21:35 IST

Ramdas Athawale: या खून प्रकरणातील दोषी असलेल्या संबंधित पोलिसांना सेवेतूनच बडतर्फ करावे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी  येथे केली. 

- हणमंत गायकवाड

लातूर -  रेणापूर येथील गिरिधारी तपघाले यांची हत्त्या झाली. या प्रकरणात गुन्हा नोंदविताना पोलिसांची कर्तव्य तत्परता दिसून न आल्याने तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आणि तिघांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. मात्र या खून प्रकरणातील दोषी असलेल्या संबंधित पोलिसांना सेवेतूनच बडतर्फ करावे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी  येथे केली. 

रेणापूर येथे जाऊन तपघाले कुटुंबियांची गुरुवारी रात्री साडेआठ वाजता सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी भेट घेतली. यावेळी ते म्हणाले, गिरिधारी तपघाले यांचा खून जातीयवादातून झालेला आहे. तपघाले कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी. तपघाले कुटुंबातील एकाला शासकीय सेवेत घ्यावे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे, यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊ. तपघाले कुटुंबाला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे भूमिका मांडू, असेही सामाजिक न्यायमंत्री आठवले म्हणाले. 

यावेळी शासकीय अधिकारी तसेच रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस चंद्रकांत चिकटे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे, देविदास कांबळे, सुनील वाहुळे, राजेंद्र कांबळे, बालाजी आचार्य, उत्तम कांबळे आदी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

पक्षाच्या वतीने दोन लाखाची मदत....रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या  वतीने तपघाले कुटुंबाला दोन लाखाची मदत जाहीर करण्यात आली. त्यापैकी काही रक्कम यापूर्वीच देण्यात आली होती. उर्वरित मदत निधी आठवले यांचे हस्ते तपघाले कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आला.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेlaturलातूर