यावेळी नांदेडच्या स्वारातीम विद्यापीठाच्या वित्त अधिकारी डॉ. दत्ता खंदारे, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनियरिंग ॲण्ड रिसर्चचे डॉ. सुदर्शन बोबडे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. खंदारे यांनी पेटंटच्या विविध प्रकाराविषयी व त्याच्या नोंदणीविषयी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. बोबडे म्हणाले, बौद्धिक संपदा नोंदणीची प्रक्रिया, विविध प्रकार व त्यातील मजकूर, क्षेत्र, कल्पना यांची नोंद कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास विविध राज्यातील विविध विद्यापीठातील ३४० प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. समन्वयक म्हणून प्रा. डॉ. बालाजी होकर्ण यांनी काम पाहिले. प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी यांनी केले. यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. कमलाकर गव्हाणे, डॉ. एकनाथ कोरपकवाड, प्रा. डॉ. मंजुनाथ मानकरी, प्रा. डॉ. राहुल आलापुरे, प्रा. डॉ. संतोष मुळे, प्रा. संतोष घोंगडे, प्रा. डॉ. अनिल मुंडे, प्रा. डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार, प्रा. सदानंद आवाळे, प्रा. राहुल बिरादार यांनी पुढाकार घेतला होता.
उदयगिरीत ऑनलाईन जाणीव जागृती कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:20 IST