शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

ड्राईव्हिंगची हौस भारी,पण लायसन्स नाही; लातुरात दोन लाख चालक विनालायसन्स रस्त्यावर

By आशपाक पठाण | Updated: September 16, 2022 16:38 IST

विना परवाना वाहन चालवित असलेल्या वाहनाचा अपघात झाला तर त्याला कुठलीही विमा सुरक्षा मिळत नाही.

लातूर : वाहन चालविण्याची हौस सर्वांनाच आहे, मात्र आपण रस्त्यावर विना परवाना चालवित असलेले वाहन हे स्वत:सह इतरांसाठीही यमदूत बनू शकते, हे अद्यापही अनेकांच्या लक्षात आलेले नाही. लातूर जिल्ह्यात तब्बल २ लाखांवर वाहन चालक विना परवाना फिरत आहेत.

विना परवाना वाहन चालवित असलेल्या वाहनाचा अपघात झाला तर त्याला कुठलीही विमा सुरक्षा मिळत नाही. अनेकदा वाहन चालविण्यात पटाईत असलेले शिक्षणाचा अभाव असल्याने परवान्याला गांभीर्याने घेत नाहीत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात परवान्यासाठी अधिक उदासिनता असल्याचे समोर आले आहे. 

विशेष म्हणजे ट्रॅक्टर, दुचाकीचालक याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. ऑगस्ट २०२२ पर्यंत लातूर जिल्ह्यात वाहनांची एकूण संख्या ५ लाख ३० हजार ४७ इतकी झाली आहे. वाहनांच्या तुलनेत मात्र परवान्याची संख्या ५० टक्केच्या जवळपास आहे. गाव सोडून शहरात आल्यावर वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाई करीत असल्याने अनेकजण मार्ग बदलून, धोका पत्करून प्रवास करीत असतात, यातून अपघाताच्या घटनाही घडतात. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ६३ हजार जणांनी वाहन परवाना काढला आहे. दरवर्षी जवळपास १५ ते २० हजार जण वाहन परवाना काढत आहेत. परिवहन विभागाकडून १७ सप्टेंबर वाहन चालक दिन म्हणून साजरा करण्यात येतो, त्यानिमित्त वाहन परवान्यावर प्रकाश टाकण्यात आला.

२ लाख ६३ हजार जणांकडे परवाना...लातूर जिल्ह्यात २ लाख ६३ हजार जणांकडे वाहन परवाना आहे. मागील ५ वर्षांची आकडेवारी लक्षात घेता परवाना काढणाऱ्यांची संख्या वार्षिक २० हजारांच्या घरात पोहचली आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत १४ हजार ३६७ जणांनी वाहन परवाना काढला असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयातून देण्यात आली.

तर दहा हजारांचा दंड...विना परवाना वाहन चालवित असल्याचे आढळून आल्यास संबंधितावर सेक्शन १८०/१८१ अंतर्गत १० हजार रूपये दंडाची तरतूद आहे. मागील वर्षभरापासून विना परवाना वाहन चालविणार्यांवर मोठी कारवाई केली जात आहे. आता वाहन परवान्यासाठी ऑनलाईन सोय झाली आहे.  स्वत:बरोबर इतरांच्या सुरक्षेसाठी वाहन परवाना  अत्यंत आवश्यक आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांनी सांगितले. लातूर जिल्ह्यात वाहनांची संख्या ५ लाखांवर असून वाहन चालविण्याचा परवाना मात्र २ लाख ६३ हजार ३६१ जणांकडे असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाहन संख्या :  दुचाकी - ४ लाख ५२ हजार ५३१                     चारचाकी - ६६ हजार ८४९                   अवजड वाहने - १० हजार ६६७  

वर्षनिहाय वाहन परवाने...२०११ : १६०९०२०१२ : १५६३६२०१३ : १८२१२२०१४ : १३५०७२०१५ : १६२३७२०१६ : २०, ६४०२०१७ : १४,८८०२०१८ : १८,५५३२०१९ : २०,०५६२०२० : १७,९३८२०२१ : १९,५१४जाने-ऑगस्ट २०२२ : १४,३६७आजवरचे एकुण परवाने : २ लाख ६३ हजार ५६१

टॅग्स :laturलातूरRto officeआरटीओ ऑफीस