शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

गुळ पावडरच्या विक्रीत दोन कोटींची फसवणूक; हैद्राबादच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 17:59 IST

हैदराबाद येथील व्यंकटेश ग्लोबल कंपनीने २ कोटी ७५ लाखांची पावडर २० ते २६ डिसेंबर २०१९ या कालावधीत नेली़ 

ठळक मुद्देलातूर जिल्ह्यातील घटना गूळ  पावडरचे पैसे दिले नाहीत

मुरुड (जि. लातूर) : साखर कारखान्यासोबत लेखी करार करून घेऊन गेलेल्या गूळ पावडरची रक्कम देण्यास टाळाटाळ करुन १ कोटी ९९ लाख ४ हजार ३७५ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात पांडू मोरामी शेट्टी (रा़ रस्ता क्ऱ १०, कृष्णानगर, हैदराबाद) व सुधाकरन बी़व्ही़ (रा़ आळंदी रोड, पुणे) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

पोलिसांनी सांगितले की, मुरुडनजीकच्या वाठवडा (ता़ कळंब) येथे डी़डी़एऩ शुगर फॅक्टरीत गूळ पावडरचे उत्पादन होते़ ही पावडर आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्री करण्यात येते़ या कारखान्याशी तेलंगणा येथील व्यंकटेश ग्लोबल कंपनीने २० डिसेंबर २०१८ ते ४ जानेवारी २०१९ या कालावधीत लेखी करार करुन २७ हजार ५०० रुपये प्रति टनाप्रमाणे एक हजार टन गूळ पावडर खरेदी केली़ या दरानुसार तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील व्यंकटेश ग्लोबल कंपनीने २ कोटी ७५ लाखांची पावडर २० ते २६ डिसेंबर २०१९ या कालावधीत नेली़ 

दरम्यान, करारानुसार ८० लाख ७० हजार ५५० रुपये धनादेशाच्या माध्यमातून कारखान्यास दिले़ परंतु, उर्वरित १ कोटी ९९ लाख ४ हजार ३७५ हजार रुपये देण्यास तेलंगणातील कंपनीने टाळाटाळ केली़ वारंवार मागणी करूनही रक्कम न दिल्याने कारखान्याचे मालक विजय प्रकाशराव नाडे यांनी संबंधित कंपनीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली़ होती.न्यायालयाच्या आदेशानुसार मुरुड पोलीस ठाण्यात आरोपी पांडू मोरामी शेट्टी  व सुधाकरन बी़व्ही़ या दोघांविरुद्ध कलम ४०६, ४२०, ३४ भादंविप्रमाणे शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अद्याप आरोपीस अटक करण्यात आली नाही़

टॅग्स :laturलातूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी