शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

उपोषणकर्त्या महिलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न

By admin | Updated: February 17, 2017 21:58 IST

शहरातील उप-विभागीय कार्यालयासमोर एका संस्थेची नोंदणी रद्द करुन संस्थेच्या कार्यकारी मंडळाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी उपोषणाला

ऑनलाइन लोकमत
उदगीर, दि. 17 -  शहरातील उप-विभागीय कार्यालयासमोर एका संस्थेची नोंदणी रद्द करुन संस्थेच्या कार्यकारी मंडळाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या महिलांच्या पेंडालला गुरुवारी रात्री अज्ञातांनी रॉकेल टाकून आग लावली. यातून महिललांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. 
उदगीर येथील बीदर रेल्वे गेटनजीक राहणारी सविता रमेश बिरादार यांच्यासह अन्य महिला ३० जानेवारीपासून उपविभागीय कार्यालयासमोर पेंडाल टाकून उपोषणास बसल्या आहेत. सिध्दार्थ इंडस्ट्रियल को-आॅप-सोसायटी लि. या संस्थेची नोंदणी रद्द करुन संस्थेच्या कार्यकारी मंडळाविरुद्घ फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी उपोषणकर्त्या महिलांनी प्रशासनाकडे केली आहे. 
उपविभागीय कार्यालयासमोर पेंडाल टाकून उपोषणाला बसलेल्या पेंडाललाच अज्ञात व्यक्तिंनी गुरुवारी रात्री रॉकेल टाकून पेटवून दिले. उपोषणकर्त्या सविता बिरादार यांच्यासोबत शांता बिरादार, माया शिंदे या महिला उपोषणस्थळी मुक्कामासाठी होत्या. पेंडालमध्ये या सर्व महिला गाढ झोपेत असताना अज्ञात तीन ते चार व्यक्तींनी पेंडाल आणि गाद्यावर रॉकेल टाकून पेटवून दिले. पेंडालला आग लागल्यामुळे उपोषणकर्त्या महिलांच्या गाद्या, सतरंज्या आणि चादरी जळून खाक झाल्या आहेत. शिवाय सविता बिरादार यांच्या साडीने पेट घेतला होता. मात्र, त्यात त्या बालंबाल बचावल्या. 
या प्रकरणी शुक्रवारी उपोषणकर्त्या महिलांनी फिर्याद दाखल केली आहे. मात्र, अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही.