...
तिरुका ग्रामपंचायत निघाली बिनविरोध
जळकोट : तालुक्यातील तिरुका येथील ग्रामपंचायतीच्या ९ सदस्यांच्या निवडीसाठी ९ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही ग्रामपंचायत बिनविरोध निघाली आहे. गावातील मारोती पांडे, सुनिता खटके, पंढरी जाधव, नरसा सगर, मीना जाधव, वनमाला पाटील, शीतल सवारे, तुळशीराम नादरगे, सूर्याजी मुंडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही ग्रामपंचायत बिनविरोध निघाली आहे.
...
माणुसकीची भिंत बनली गरिबांचा आधार
निलंगा : येथील जाकीर सामाजिक विकास संस्थेअंतर्गतच्या जनहित स्वच्छता अभियान टीमच्या मदतीने माणुसकीची भिंत उभारण्यात आली आहे. त्यासाठी जाकीर शेख, राहुल पोतदार, अबू सय्यद, ऋषिकेश पोतदार, लखन लोंढे, आजम सय्यद, रोमान तांबोळी, सैफ शेख, विजय माने, कृष्णा पळसे, शाहंजेब कादरी, राम लोंढे, किरण सोळुंके, इरफान शेख आदींनी पुढाकार घेतला आहे.
...
सेवानिवृत्त गरुड, पाटील यांचा सत्कार
औराद शहाजानी : येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयातील प्रा. भालचंद्र गरुड, प्रा. सुरेंद्र पाटील हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सपत्नीक सत्कार करुन निरोप देण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष विश्वनाथराव वलांडे गुरुजी होते. यावेळी सचिव रमेश बगदुरे, उपसचिव बस्वराज वलांडे, माजी प्राचार्य शिवाजीराव जाधव, अनिल डोईजोडे, दगडू गिरबणे, मडोळय्या मठपती, मतीनसाब आळंदकर, प्राचार्य श्रीराम पाटील, मुख्याध्यापक वसंत पाटील, प्राचार्य डॉ. अजितसिंह गहेरवार, निर्मला गरुड, ओमदेवी पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. शंकर कल्याणे यांनी केले. प्रा. विजयकुमार पवार यांनी आभार मानले.
...