शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

दर कोसळल्याने टोमॅटो जनावरांच्या दावणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:24 IST

औराद शहाजानी (जि. लातूर) : सततच्या अति पावसामुळे टोमॅटोला फटका बसला आहे. त्यातच बाजारपेठेत २ ते ४ रुपये प्रति ...

औराद शहाजानी (जि. लातूर) : सततच्या अति पावसामुळे टोमॅटोला फटका बसला आहे. त्यातच बाजारपेठेत २ ते ४ रुपये प्रति किलो असा भाव मिळत आहे. त्यामुळे तोडणीचाही खर्च निघत नसल्याने निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरातील काही शेतकरी टोमॅटो जनावरांच्या दावणीला पशुखाद्य म्हणून टाकत आहेत.

जिल्ह्यातील औराद शहाजानीसह वडवळ नागनाथसह जवळपास ५० गावांतील शेतकरी टोमॅटोचे उत्पादन घेतात. नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या टोमॅटोची दिल्ली, मुंबई, कोलकाता, बेंगळुरूर, हैदराबादसह उत्तरप्रदेश, हरियाणा, राजस्थानमधील व्यापारी या भागात येऊन शेतावर खरेदी करतात. यंदा राज्यात टोमॅटोचे क्षेत्र वाढले आहे. दरम्यान, गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे टोमॅटोस फटका बसला. तसेच बाजारपेठेत मागणीही कमी असतानाही टोमॅटोला २ ते ४ रुपये प्रति किलो दर मिळत आहे. त्यातून ताेडणीचा खर्चही निघेनासा झाला आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक हतबल झाले आहेत. काही शेतकरी नाइलाजास्तव जनावरांना चारा म्हणून टोमॅटो टाकत आहेत.

तोडणीचा खर्चही निघेना...

मी दोन एकरवर टोमॅटोची लागवड केली आहे. सध्या टोमॅटो ताेडणीला आले असताना बाजारपेठेत मागणी नाही. अतिपावसामुळे बाहेरील व्यापारी खरेदीसाठी तयार नाहीत. जिल्ह्यातील किरकोळ बाजारात २ रुपये प्रति किलो दर मिळत आहे. त्यातून तोडणीचा खर्चही निघेनासा झाला आहे. शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी.

- भागवत बिरादार, शेतकरी, तगरखेडा.

सोबत फोटो...

११ एलएचपी औराद शहाजानी १ : टोमॅटोचे भाव कोसळल्याने निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथील शेतकरी भागवत बिरादार यांनी जनावरांच्या दावणीला चारा म्हणून टोमॅटो टाकले आहे.