शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

लातूरच्या पाण्यासाठी रेल्वेची आज दुसरी खेप

By admin | Updated: April 13, 2016 00:43 IST

मिरजेत तयारी : पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर

मिरज : मिरजेतून सोमवारी १० टँकर लातूरला पाठविल्यानंतर आणखी दहा टँकरची पाणी एक्स्प्रेस बुधवारी सकाळी लातूरला जाणार आहे. लातूरला पाणीपुरवठ्यासाठी मिरज रेल्वेयार्डापर्यंत पाईपलाईनचे काम युध्दपातळीवर करण्यात येत असून, शनिवारपासून ५० टँकर भरून रेल्वे लातूरला जाणार आहे. लातूरला पाणी पुरवठ्यासाठी २५ लाख लिटर क्षमतेचे ५० टँकर भरण्यासाठी रेल्वेच्या जलशुध्दीकरण केंद्राची क्षमता वाढविण्याचे व रेल्वे यार्डापर्यंत पाईपलाईनचे १ कोटी ८४ लाख रुपये खर्चाचे काम युध्दपातळीवर करण्यात येत आहे. चार जेसीबी व १०० मजुरांच्या साहाय्याने अडीच किलोमीटर लांब नवीन पाईपलाईनचे काम शुक्रवारपर्यंत पूर्ण होणार असल्याचे जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वेस्थानकातील यंत्रणेव्दारे पाणी भरण्याची गती अत्यंत कमी असल्याने केवळ दहा टँकर भरून लातूरला पाठविण्यात येत आहेत. सोमवारी दहा टँकरने सुमारे ५ लाख ४० हजार लिटर पाणी लातूरला रवाना झाले. त्यानंतर आणखी १० टँकर भरण्याचे काम मंगळवारी दिवसभर रेल्वेस्थानकातील प्लॅटफॉर्म दोनवर सुरू होते. टँकर भरण्याचे काम पहाटेपर्यंत पूर्ण झाल्यास उद्या बुधवारी सकाळी लातूरला पाणी पाठविण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)आणखी पन्नास टॅँकरची रेल्वे येणारपन्नास टॅँकर असलेली रेल्वे सध्या मिरजेत आहे. सध्या यातील दहा टॅँकरचाच वापर होत आहे. शनिवारपासून पूर्ण क्षमतेने ५० टॅँकर लातूरला जाणार आहेत. एक रेल्वे लातूरला रवाना झाल्यानंतर दुसरी रेल्वे पाणी भरण्यासाठी असायला हवी. तरच दररोज लातूरला पाणीपुरवठा करता येणार आहे. त्यामुळे आणखी पन्नास टॅँकरची रेल्वे बुधवारी मिरजेत दाखल होणार आहे. म्हणजे एकूण १०० रेल्वे टॅँकर उपलब्ध होणार आहेत.