शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

व्यापा-याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून लांबवले 6 लाख रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2017 15:33 IST

एका व्यापा-याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून, चाकू हल्ला करत त्याच्याकडील सहा लाख रुपये असलेली बॅग दोन जणांनी हिसकावल्याची घटना समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत

लातूर, दि. 14 -  एका व्यापा-याच्या डोळ्यात मिरची पूड फेकून, चाकू हल्ला करत त्याच्याकडील सहा लाख रुपये असलेली बॅग दोन जणांनी हिसकावल्याची घटना समोर आली आहे. शहरातील पापविनाश रोडवरील ही घटना आहेत. सोमवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.  या घटनेमुळे शहरात दहशतीचं वातावरण आहे. 
 
कापड व्यपारी नरेश रतनलाल जाजू (५०) यांचे दयाराम रोड येथे डिलक्स नावाचे गारमेंटचे मोठे दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आपले दुकान बंद   घराकडे नोकरासह दुचाकीवरुन निघाले. दरम्यान, १०.३० वाजण्याच्या सुमारास घरासमोरील रस्त्याकडेला आपली दुचाकी पार्क करत असताना, पाठीमागून लाल रंगाच्या दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात लुटारुंनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली आणि त्यांच्या हातातील ६ लाख रुपयांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. 
 
यावेळी नोकरासोबत या दोघांची झटापट झाली असता, त्याच्यावर चाकू हल्ला करत त्यांनी ही  बॅग हिसकावत दुचाकीवरुन पळ काढला. काही कळायच्या आतच हे दोन लुटारू दुचाकीवरुन पसार झाले. याप्रकणी व्यापारी नरेश जाजू यांच्या फिर्यादीवरुन गांधी चौक पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पाळत ठेवून लुटले...?
व्यापारी नरेश जाजू यांच्यावर पाळत ठेवून त्यांना लुटण्यात आल्याचा अंदाज गांधी चौक पोलिसांनी व्यक्त केला आहे. दिवसभर दुकानात बसून राहणा-या जाजू यांच्यावर दररोज किती वाजता हे घराकडे जातात, कुठल्या मार्गाने जातात आणि कुठल्या दुचाकीवरुन जातात याची माहिती घेऊन, त्यांच्यावर काही दिवसांपासून पाळत ठेवूनच त्यांना लुटल्याचा अंदाज आहे. लुटारू हे नेहमीचेच सराईत असावेत असाही अंदाज पोलिसांचा आहे.
 
लुटालुटीच्या घटनांत वाढ
दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांकडून दिवसाढवळ्या महिला आणि वयोवृद्घ नागरिकांना लुटण्याच्या घटना अलिकडे मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. पोलीस केवळ तक्रार दाखल करण्यापलीकडे काहीच करत नसल्याने, लुटारुंचे मनोधर्य वाढत आहे. चापोलीनजीक चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. नगरच्या महिलांना चालत्या आटोतून लुटल्याची घटनाही यापूर्वी घडली आहे. विशेष म्हणजे दिवसाढवळया लुटण्याच्या घटनांमुळे नागरिकांसह व्यापारी वर्गात दशहत आहे. याकडे पोलिस यंत्रणा मात्र, फारसे  गांभीर्याने पहायला तयार नाही. हे विशेष..!