शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

यंदाही मुलांच्या तुलनेत मुलीच वरचढ; बाेर्डात पुन्हा लातूरच अव्वलस्थानी !

By संदीप शिंदे | Updated: May 21, 2024 19:03 IST

कला शाखेचा ८८.५५ टक्के, विज्ञान ९८.१७, तर वाणिज्य शाखेचा ९३.९९ टक्के निकाल

लातूर : इयत्ता बारावीच्या परीक्षेत लातूर जिल्ह्यातील कला शाखेचा ८८.५५ टक्के, विज्ञान ९८.१७, तर वाणिज्य शाखेचा ९३.९९ टक्के निकाल लागला असून, मुलांच्या तुलनेत यंदाही मुलीच वरचढ ठरल्या आहेत. लातूर विभागीय मंडळांतर्गत असलेल्या तीन जिल्ह्यांमध्ये लातूर ९२.३६ टक्के मिळवीत अव्वलस्थानी राहिला आहे.

लातूर जिल्ह्यात बारावी परीक्षेस ३५ हजार ५८९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पैकी ३३ हजार ५६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ९४.३० आहे. जिल्ह्यात लातूर तालुक्याचा ९२.८८ टक्के, अहमदपूर ९५.६१, औसा ९५.८९, चाकूर ९५.७९, देवणी ९४.५८, जळकोट ९४.६३, निलंगा ९५.७८, रेणापूर ९३.९१, शिरूर अनंतपाळ ९४.९७, तर उदगीर तालुक्याचा ९४.७८ टक्के निकाल लागला आहे. जिल्ह्यात मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.५६, तर मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.५० टक्के आहे.

५२३९ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात...जिल्ह्यात परीक्षेस बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ३३ हजार ५६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यात ५२३९ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात, १४ हजार ७०२ प्रथम श्रेणीत, तर ११ हजार ७५० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

विज्ञान शाखेचा निकाल ९८.१७ टक्के...विज्ञान शाखेत १९ हजार ७२५ विद्यार्थी परीक्षेस सामोरे गेले होते. पैकी १९ हजार ३६३ उत्तीर्ण झाले असून, या शाखेचा निकाल ९८.१७ टक्के लागला आहे. त्यापाठोपाठ कला शाखेतून ९७७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पैकी ८६५८ उत्तीर्ण झाले. या शाखेचा निकाल ८८.५५ टक्के लागला.

वाणिज्य शाखेत चार हजार उत्तीर्ण...वाणिज्य शाखेत ४ हजार ६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पैकी ३ हजार ८१७ उत्तीर्ण झाले आहेत. या शाखेचा निकाल ९३.९९ टक्के लागला आहे. सोबतच एचएससी व्होकेशनल विभागातून १८५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पैकी १५७० उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी ८४.४९ अशी आहे.

कॉपीप्रकरणी ९ विद्यार्थ्यांवर कारवाई...लातूर जिल्ह्यात यंदा कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पडली. जिल्ह्यातील काही केंद्रांवर कॉपीची प्रकरणे आढळली होती. यातील गैरप्रकार आढळून आलेल्या ९ विद्यार्थ्यांची मंडळाकडून चौकशी करण्यात आली. चौकशीअंती या सर्व विद्यार्थ्यांच्या एक विषयाची संपादणूक रद्द करून कारवाई करण्यात आली आहे.

४७९ जणांना क्रीडा गुणांचा लाभ...बारावी परीक्षेसाठी मंडळाकडे दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावांपैकी ४७९ विद्यार्थ्यांना क्रीडा ग्रेस गुणांचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी क्रीडागुणांचे प्रस्ताव क्रीडा विभागाकडून विभागीय मंडळाकडे सादर केले होते.

५ जूनपर्यंत करता येणार गुणपडताळणी...ऑनलाइन निकालानंतर गुण पडताळणीसाठी २२ मे ते ५ जुनपर्यंत विहित नमुन्यात मंडळाकडे अर्ज करणे आवश्यक आहे, असे लातूर विभागीय मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

श्रेणीसुधार गुणपत्रिका हस्तगत करणे बंधनकारक...या परीक्षेत उत्तीर्ण झाले; परंतु गुण कमी पडले असे वाटते, अशा विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी, गुणसुधार योजनेंतर्गत लगतच्या फक्त दोनच परीक्षांमध्ये पुनश्च परीक्षेस प्रविष्ट होता येईल. फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षेस प्रविष्ट होऊन सर्व विषयांत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जुलै- ऑगस्ट, फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या परीक्षेस श्रेणी-सुधारसाठी प्रविष्ट होता येईल. मात्र, गुणपत्रिका वितरित झाल्यापासून एक महिन्याच्या आत विकल्प भरून गुणपत्रिका हस्तगत करणे बंधनकारक राहील, असेही मंडळाने कळविले आहे.

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालlaturलातूर