शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

नळ कनेक्शन नसताना पाणीपट्टीचा दणका, लातूर मनपाच्या व्हॉटस्ॲपवर तक्रारींचा पाऊस !

By हणमंत गायकवाड | Updated: September 26, 2022 18:07 IST

मालमत्ता कर आणि नळपट्टीची एकत्र मागणी बिल शहरातील मालमत्ताधारकांना देण्यात आली आहे.

लातूर : महापालिकेने मालमत्ता व नळधारकांना दिलेल्या अनेकांच्या थकबाकी बिल पत्रामध्ये अव्वाच्या सव्वा मागणी करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे मालमत्ता व नळधारक हैराण झाले असून, ७५ टक्के नागरिकांकडे नळ कनेक्शन नसताना नळपट्टीची मागणी केल्याचे मनपाच्या व्हॉटस्ॲपवर आलेल्या गाऱ्हाण्यावरून आता उघड झाले आहे. 

मालमत्ता कर आणि नळपट्टीची एकत्र मागणी बिल शहरातील मालमत्ताधारकांना देण्यात आली आहे. त्यामध्ये अनेकांकडे नळ कनेक्शन नसताना त्यांना नळपट्टी लावलेली आहे. शिवाय, अनेकांनी मालमत्ता कराची थकबाकी भरली असताना परत मागणी बिल देण्यात आले आहे. यावर महानगरपालिकेने मालमत्ताधारकांकडून ७७७००१४३०५ या व्हॉटस्ॲपवर तक्रार करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार १७० जणांनी व्हॉटस्ॲपवर तक्रार नोंदविली आहे. यातील ७५ टक्के तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे की, माझ्याकडे नळ कनेक्शन नाही. तरीपण बिल देण्यात आले आहे. उर्वरित २५ टक्क्यांमध्ये काही जणांनी बिल भरले आहे, तर काही जणांना जास्त बिल लागले आहे. या व्हॉटस्ॲप क्रमांकावर तक्रारींचा ओघ सुरूच आहे.

२० हजार नळ कनेक्शनचा पत्ता लागेना !पाण्याचा वापर होत असलेल्या २० हजार नळकनेक्शनचा महानगरपालिकेला पत्ता लागत नाही. त्यामुळेही ज्यांच्याकडे कनेक्शन नाही त्यांनाच बिल देण्यात आले आहेत. या सर्व बाबींचा शोध आता व्हॉटस्ॲपच्या तक्रारीवरून लागणार आहे.

भाडेकरूंच्या नावाने नळ कनेक्शनमालमत्ता नसताना भाडेकरूंच्या नावाने नळकनेक्शन आहे. मालमत्ता एकाच्या नावाने आणि भोगवटादाराच्या नावाने नळ कनेक्शन असल्यामुळेही पाणीपट्टी आणि मालमत्ता कराच्या एकत्र बिलाचा घोळ झालेला आहे. दरम्यान, संबंधित व्हॉटस्ॲप क्रमांकावर तक्रारी नोंदवाव्यात. त्याची सोडवणूक करून होणारी गैरसोय टाळली जाईल, असे आश्वासन मनपाकडून देण्यात येत आहे.

आतापर्यंत १७० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नळपट्टीबाबतच्या तक्रारी तात्काळ विचारात घेऊन त्या सोडविल्या जात आहेत. मालमत्ता कराच्या बाबतचे गाऱ्हाणे मात्र संबंधित झोनच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे पाठवून खात्री करून घेतली जात आहे. लवकरच हा प्रश्न निकाली निघेल. - मयुरा शेंद्रेकर, उपायुक्त मनपा

टॅग्स :laturलातूरMuncipal Corporationनगर पालिकाTaxकर