गरुड चौक परिसरातून मोबाइलची चोरी
लातूर : विवेकानंद चौक ते गरुड चौक नांदेडकडे जाणाऱ्या रस्त्यावर चालत जात असताना मोबाइलची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत आनंद मंगळराव पडसाळे (रा. इंद्रानगर लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास करीत आहेत.
घरासमोर पार्किंग केलेल्या दुचाकीची चोरी
लातूर : औसा शहरातील गणेशनगर परिसरातील घरासमोर पार्किंग केलेल्या एम. एच. २४ एन १९२१ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत अब्दुल सलीम अलीसाब चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून औसा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल करीत आहेत.
प्रशासकीय इमारतीच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीला
लातूर : शहरातील प्रशासकीय इमारतीच्या पार्किंग शेडमधून एमएच २४, झेड ९३२७ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत सचिन शिवाजी माळी (रा. काजीनगर, जुना औसा रोड, लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पुन्हा पाचपुते करीत आहेत.
सावरी येथे घरासमोर पार्किंग केलेली दुचाकी लंपास
लातूर : औसा तालुक्यातील सावरी गावात घरासमोर पार्किंग केलेल्या एमएच २४, डीसी ६२९० या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत जीवन वसंतराव कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून औसा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गौंडगाव हे करीत आहेत.