शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नयनरम्य फटाक्यांच्या आतषबाजीने सिद्धेश्वर यात्रेची सांगता

By संदीप शिंदे | Updated: March 8, 2023 18:00 IST

महाशिवरात्रीच्या दिवशी १८ फेब्रुवारी रोजी यात्रेचा शुभारंभ झाला. या कालावधीत लाखो भाविकांनी श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वराचे दर्शन घेतले.

लातूर : मागील १८ दिवसांपासून सुरू असणाऱ्या ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व श्री रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवाची फटाक्यांच्या आतषबाजीने सांगता झाली. रंगीबेरंगी हजारो फटाक्यांच्या आतषबाजीने देवस्थानचा आसमंत उजळून निघाला.

महाशिवरात्रीच्या दिवशी १८ फेब्रुवारी रोजी यात्रेचा शुभारंभ झाला. या कालावधीत लाखो भाविकांनी श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वराचे दर्शन घेतले. यात्रेनिमित्त बच्चे कंपनी व तरुणांनी आनंदनगरीचा आनंद लुटला. या कालावधीत कीर्तन, भजन, श्री सिद्धेश्वर कृषी महोत्सव व पशुप्रदर्शन, १००१ महिलांकडून रुद्राभिषेक, पाककला स्पर्धा आदी उपक्रम झाले. या उपक्रमांनाही भरभरून प्रतिसाद मिळाला. देवस्थानच्या वतीने आयोजित कुस्ती स्पर्धेला राज्यातील मल्लांनी भरभरून प्रतिसाद दिला. सोमवारी रात्री परंपरेप्रमाणे फटाक्यांच्या आतषबाजीने यात्रेची सांगता झाली. रात्री ८ वाजता प्रशासक सचिन जांबूतकर व मधुकर गुंजकर यांच्या हस्ते आतषबाजीस प्रारंभ झाला. बराच काळ आतषबाजी सुरू होती. आतषबाजीच्या माध्यमातून विविध देखावे सादर करण्यात आले. यात शिवलिंग, श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानचे नाव, विविध प्रकारच्या आकृत्या यांचा समावेश होता. या आतषबाजीने उपस्थित भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.यावेळी देवस्थानचे प्रशासक तथा निरीक्षक सचिन जांबूतकर, ज्येष्ठ विश्वस्त विक्रम गोजमगुंडे, अशोक भोसले, विशाल झांबरे, ओम गोपे यांच्यासह विश्वस्त मंडळातील सदस्यांची उपस्थिती होती. यात्रा काळात सहकार्य केल्याबद्दल देवस्थानच्या वतीने सर्वांचे आभार मानण्यात आले.

 

टॅग्स :laturलातूरcultureसांस्कृतिक