शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

शासकीय दूध भुकटी प्रकल्प निघणार भंगारात ! एकेकाळी उदगीरचे होते वैभव

By संदीप शिंदे | Updated: July 28, 2023 17:39 IST

शासनस्तरावरून आता हा प्रकल्प भंगारमध्ये काढण्याच्या हालचाली सुरू

उदगीर : एकेकाळी तालुक्याचे वैभव असलेला शासकीय दूध भुकटी प्रकल्प आता शेवटच्या घटका मोजत आहे. हा प्रकल्प मागील काही वर्षांपासून बंद असून, शासनस्तरावरून आता हा प्रकल्प भंगारमध्ये काढण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे शासनाने मान्यता दिल्यानंतर काही दिवसांत निविदा निघणार असून, प्रकल्प सुरू करण्याच्या दृष्टीने मागील १४ वर्षांत हालचाल न झाल्याने ही वेळ आली आहे. दरम्यान, प्रकल्पाची मोकळी जागा महत्त्वाची ठरणारी आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी १९७८मध्ये उदगीर येथील शासकीय दूध भुकटी प्रकल्पाचे भूमिपूजन केले. दि. १९ जानेवारी १९७९मध्ये तो सुरू झाला. जून २००२ पर्यंत हा प्रकल्प सुरू होता. त्यानंतर या ना त्या कारणाने तो बंद पडला. नोव्हेंबर २००८ मध्ये तत्कालीन आमदार चंद्रशेखर भोसले यांच्या पाठपुराव्याने मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन केले. मात्र, त्यानंतर पुन्हा बंद पडला तो अद्यापपर्यंत चालूच झाला नाही. नव्याने या प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनासाठी समितीने १३ कोटी खर्चाचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. मात्र त्यावर कारवाईच झाली नाही.

दूध भुकटी प्रकल्पाची क्षमता दररोज १ लाख २० हजार लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची होती. प्रकल्पाच्या ६० किलोमीटर परिसरातील अंबाजोगाई, गंगाखेड, भूम, परंडा , कळंब, अहमदपूर, लोहा, निलंगा, परभणी, धाराशिव, उमरगा आदी ठिकाणचे कच्चे थंड केलेले दूध भुकटी प्रकल्पासाठी येत होते. दूध भुकटी प्रकल्पातून तयार झालेली दूध भुकटी व पांढरे लोणी देशातील अनेक भागांत विकले जात होते. यातून राज्य शासनास चांगले उत्पन्न मिळत होते. त्याकाळात ५३५ कर्मचारी काम करत होते. शासनाने १३ एकर जागेवर दोन कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प सुरू केला होता. तब्बल २४ वर्षे उत्तम प्रकारे चालला. २००२ ते २००८ या काळात हा प्रकल्प बंद पडलेला होता. या प्रकल्पाच्या देखभाल दुरुस्तीसाठी २ कोटी ५९ लाख रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आले. डिसेंबर २०१४ ते ७ ऑगस्ट २०१५ पर्यंत दूध भुकटी प्रकल्प सुरू होता. मात्र, ऑगस्ट २०१५ नंतर बॉयलरमध्ये अडचणी निर्माण झाल्यामुळे तो बंद झाला तो आजपर्यंत बंदच आहे.

प्रकल्पातील मशिनरीचे कंपनीकडून मुल्यांकन...सुरुवातीला या प्रकल्पात पाचशेपेक्षा जास्त कर्मचारी आज केवळ आठ कर्मचारी कामावर आहेत. आता हा प्रकल्प बंदच आहे. छत्रपती संभाजीनगर येथील एका कंपनीमार्फत या मशिनरीचे मूल्यांकन करण्यात आले असून, त्याची माहिती माहीती शासनाकडे पाठविण्यात आली असल्याचे उदगीर येथील प्रभारी दुग्धशाळा उपव्यवस्थापक नितीन फावडे यांनी सांगितले. यानंतर पुढील कारवाई काय होणार याबद्दल माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरState Governmentराज्य सरकार