उदगीर पंचायत समितीची अस्तित्वात आल्यानंतर प्रशासकीय इमारत १९६६ मध्ये बांधण्यात आली. या इमारतीच्या छताला ठिकठिकाणी गळती लागली आहे. भिंतीला तडे गेले आहेत. त्याचबराेबर स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्टमध्ये सदर इमारत जुनी, जीर्ण आणि धोकादायक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समिती उदगीर येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित केले आहे. सदरची जागा पंचायत समितीच्या नावे असून, पंचायत समिती 'ब' दर्जाची आहे. एकूण बांधकामाचे क्षेत्रफळ २२०९.२१ चौरस मीटर एवढे प्रस्तावित केले आहे. लातूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपमुख्य वास्तुशास्त्र सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग औरंगाबाद यांच्याकडे १०८६.७१ लक्ष अंदाजपत्रक सादर केले होते. यासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने उदगीर पंचायत समितीच्या नवीन इमारत बांधकामासाठी ९ कोटी ७५ लाख ५६ हजार अंदाजपत्रकीय निधीला शासनाच्या वतीने प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, असेही राज्यमंत्री बनसोडे म्हणाले.
उदगीर पंचायत समितीच्या इमारतीसाठी दहा कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:20 IST