उदगीर तालुक्यातील कुमदाळ येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रे बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस बबन दादा मुदाळे, सरपंच राम ज्ञानोबा शिळवणे, ग्रामसेवक सोळुंके राजकुमार सोळंके, ग्रामपंचायत सदस्य इसाक पीर अहमद पटेल, रामदास भानुदास एैनीले, अशोक हनमंत खपले, बाबूराव नागशेट्टी पाटील, दिलीप गणपती चुळबूळकर, महेश बाबूराव पाटील, वीरभद्र माणिकराव पाटील, रामदास मिरकले, शाम स्वामी, माधव पाटील, धोंडिबा सगर, जरीब पठाण, नसीब पठाण, जनार्धन खपले, राम भालेराव, संजीव भालेराव, नंदकुमार पटणे, वैजनाथ झुंकलवाड, अरविंद पाटील आदींची उपस्थिती होती. केंद्रे म्हणाले, या अभियानांतर्गत पाण्याच्या बाबतीत गावे स्वयंपूर्ण होणार असून, ग्रामपंचायतीने यासाठीचे आराखडे तयार करून चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करून घ्यावी, असे आवाहनही केले आहे.
जल जीवन मिशनअंतर्गत प्रत्येक घराला नळ कनेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:18 IST