शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
7
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
8
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
9
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
10
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
11
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
12
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
13
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
14
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
15
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
16
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
17
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
18
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
19
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
20
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

कर्णबधीर बालकांच्या हाकेला लातूर जिल्हा परिषदेची मदतीची साथ; बेरा मशीनवर होणार तपासणी

By हरी मोकाशे | Updated: July 15, 2023 18:15 IST

पालकांची धावपळ थांबली; स्त्री रुग्णालयाला दिली अत्याधुनिक बेरा मशिन

लातूर : शहरातील स्त्री रुग्णालयात बालकांच्या कर्णदोषाच्या तपासणीसाठीची मशिन नसल्याने पालकांची धावपळ होत होती. शिवाय, रुग्णालय प्रशासनाला खासगी केंद्राला पैसे देऊन मनधरणी करावी लागत होती. ही अडचण जाणून घेत जिल्हा परिषदेने आपल्या सेस फंडातून स्त्री रुग्णालयाला अत्याधुनिक बेरा मशिन उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे वेळेत आणि विनामूल्य उपचार मिळू लागल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे.शहरातील स्त्री रुग्णालय हे शंभर खाटांचे असून, तिथे महिन्याकाठी सरासरी ३०० महिलांच्या प्रसूती होतात. दरम्यान, जन्मजात कर्णदोष असलेल्या बालकांवर तत्काळ उपचार व्हावेत म्हणून प्रत्येक नवजात शिशूची ‘ओएई’ ही कानाची तपासणी करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. या तपासणीत ऐकण्यास सक्षम नसलेल्या बालकांच्या कानाची बेरा ही तपासणी केली जाते.

स्त्री रुग्णालयात या तपासणीसाठीची मशिन नसल्याने खासगी डॉक्टरांचा आधार घ्यावा लागत असे. त्यासाठी वार्षिक करार करून तपासणीनुसार पैसे द्यावे लागत असत. परिणामी, तपासणीसाठी वेळेबरोबरच पैशांचाही खर्च होत असे. ही अडचण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी जाणून घेतली. त्यांनी जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नातील दिव्यांगांसाठीच्या ५ टक्के रकमेतून बेरा ही अत्याधुनिक मशिन स्त्री रुग्णालयाला उपलब्ध करून दिली आहे.

रुग्णालयाची वार्षिक सव्वा लाखांची बचत...जिल्हा परिषदेने उपलब्ध करून दिलेल्या मशिनची किंमत जवळपास ११ लाख ५० हजार रुपये आहे. या मशिनमुळे स्त्री रुग्णालयाची वार्षिक सरासरी १ लाख २४ हजार रुपयांची बचत झाली आहे. शिवाय, रुग्णालयातच तपासणी करण्यात येत असल्याने पालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

तर लेकरू होऊ शकते मूकबधीर...बाळाच्या कानावर आपले बोललेले शब्द पडल्यानंतर ते ऐकून बाळ त्याची उच्चारणा करण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे बाळांकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. विशेषत: मुदतपूर्व प्रसूती तसेच कमी वजन असलेल्या शिशूंची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. कर्णदोषामुळे बालक मूकबधीर होण्याची भीती असते, असे कान, नाक, घसा तज्ज्ञांनी सांगितले.

तपासणीसाठीची परवड थांबली...जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गाेयल यांनी कर्णदोष असलेल्यांवर तत्काळ उपचार व्हावेत म्हणून जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नातील दिव्यांगांसाठीच्या ५ टक्के रकमेतून ही मशिन उपलब्ध करून दिली. त्यामुळे ऐकू न येणाऱ्या बालकांना तपासणीसाठी पुणे, मुंबई अशा मोठ्या शहरांत घेऊन जावे लागणार नाही. येथेच निदानासाठी तपासणी होणार आहे.- संतोषकुमार नाईकवाडी, समाज कल्याण अधिकारी

स्त्री रुग्णालयातच आता सुविधा...जिल्हा परिषदेने मशिन उपलब्ध करून दिल्याने आता स्त्री रुग्णालयातच कर्णदोष असलेल्या बालकांच्या ओएई आणि बेरा या दोन्ही तपासण्या होत आहेत. त्यामुळे पालकांची धावपळ थांबण्याबरोबरच पैशांचीही बचत झाली आहे.- डॉ. अशोक बडे, वैद्यकीय अधीक्षक, स्त्री रुग्णालय.

टॅग्स :laturलातूरMedicalवैद्यकीय