शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

राहत्या घरात गळफास घेऊन विद्यार्थ्याची आत्महत्या

By admin | Updated: March 14, 2017 14:57 IST

लातूर तालुक्यातील मुरुड येथे शंकरनगर परिसरात राहणा-या इयत्ता बारावीतील विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली आहे.

ऑनलाइन लोकमत

लातूर, दि. 14 - लातूर तालुक्यातील मुरुड येथे शंकरनगर परिसरात राहणा-या इयत्ता बारावीतील विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली आहे. सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास त्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले.  या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 
विजय माळी असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.  मंगळवारी त्याने शंकरनगर भागातील नवीन बांधकाम झालेल्या घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली. या आत्महत्येमागचे कारण मात्र, अद्याप स्पष्ट झालेले नाही. परीक्षेच्या तणावातून त्यानं आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  
 
दोन दिवसांपासून विजय अस्वस्थ
विजय हा गेल्या दोन-तीन दिवसांपासून तणावाखाली असल्यामुळे तो अस्वस्थ होता, असे कुटुंबीयांनी सांगितले.  घरीही फारसे कोणाशी बोलत नव्हता. शिवाय त्याचा इयत्ता बारावीचा मंगळवारी शेवटचा पेपर होता. त्यापूर्वीच त्याने आत्महत्या केली. यातून त्याच्यावर बारावीचे पेपर अवघड गेले असावेत, असेही कुटुंबीयांनी सांगितले.
 
पंधरा दिवसात दुसरी घटना
गेल्या २८ फेब्रुवारी रोजी राहत्या खोलीवर इयत्ता ११ वीत असलेली अनुसरी झींजे या मुलीनेही गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पंधरा दिवसातील विद्यार्थी आत्महत्येची ही दुसरी घटना आहे.