घरातील रुग्णांची अचानक तपासणी...
गृहविलगीकरणात असणाऱ्या रुग्णांची अचानक भेट देऊन तपासणी केली जाणार आहे. त्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती बैठकीत सांगण्यात आली. या संदर्भात राज्यमंत्री बनसोडे यांनीही अचानक भेटी द्याव्यात, असे म्हटले आहे.
रेमडेसिवीरचा काळाबाजार नको...
रेमडेसिवीरची मागणी लक्षात घेता औषधांचा काळाबाजार होणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, अशा सूचना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या. तसेच नागरिकांनी आरोग्य विभागाच्या १०४ या हेल्पलाइनवर संपर्क करून आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, असेही राज्यमंत्री बनसोडे यांनी स्पष्ट केले.
माहिती लपविल्यास कारवाई...
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती लपविणाऱ्या हॉस्पिटल, लॅबवर कारवाई करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या. तसेच गृहविलगीकरणातील रुग्णांच्या दररोज संपर्कात राहण्यासाठी आशा वर्कर्स आणि स्थानिक प्रशासनाची मदत घ्यावी, अशा सूचनाही राज्यमंत्री बनसोडे यांनी दिल्या आहेत.