लातूर : वीकेंड लाॅकडाऊनमधील निर्बंधानुसार जिल्ह्यात ८ ते १३ मेदरम्यान कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने व वाहतूक बंद राहणार आहे. ३० एप्रिलच्या निर्बंधानुसार पूर्ण जिल्ह्यात हे निर्बंध असतील.
८ मे रोजी सकाळी ७ वाजतापासून १३ मेपर्यंत कडक निर्बंधाचे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिले आहेत. या निर्बंधाचे सर्व संबंधित विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी तंतोतंत पालन करावे, असेही या आदेशात म्हटले आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील सहा दिवस वीकेंड लाॅकडाऊनप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.
या कालावधीत फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. अन्य आस्थापना, वाहतुकीला निर्बंध आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी या निर्बंधाचे पालन करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे.