शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

निलंगा-लातूर बसवर दगडफेक; दाेघा अज्ञातावर गुन्हा, जाऊ पाटी नजीकची घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 19:54 IST

दरम्यान, हल्ला करणारे माेटारसायकलवरुन पसार झाल्याचे समाेर आले आहे.

लातूर : लातूर येथून निलंग्याकडे प्रवासी घेऊन निघालेल्या बसवर लातूर-बीदर महामार्गावरील जाऊ पाटीनजीक अज्ञाताने दगडफेक केल्याची घटना साेमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत किल्लारी पाेलीस ठाण्यात दाेघा अज्ञाताविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हल्ला करणारे माेटारसायकलवरुन पसार झाल्याचे समाेर आले आहे.

पाेलिसांनी सांगितले, गत ४६ दिवसांपासून एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनिकरण करण्यात यावं, या मागणीसाठी एसटी कामगार, कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. महागाई भत्ता, घरभाडे वाढ आणि मूळ वेतनात करण्यात आलेल्या वाढीनंतरही राज्यासह लातूर विभागातील एसटी कामगार, कर्मचारी आपल्या विलनिकरणाच्या मागणीवर अडून बसले आहेत. परिणामी, संप काळात प्रवाशांचे माेठ्या प्रमाणावर हाल सुरु आहेत. दरम्यान, निलंगा आणि औसा आगारातील काही चालक-वाहक कामावर रुजू झाले आहेत. निलंगा आगरातील सात, औसा आगारातील दोन आणि लातूर आगारातील दोन बसेस शनिवार, रविवार आणि साेमवारी धावल्या. साेमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास लातूर येथून निलंग्याकडे प्रवासी घेऊन निघालेल्या बसवर (एम.एच.२० बीएल २०१७) लातूर-बीदर महामार्गावरील जाऊ पाटीवर दोघा अज्ञाताने दगडफेक करून बसच्या समोरील काचा आणि खिडकीच्या काच फोडल्या. दगडफेक करणाऱ्या दाेघा अज्ञातांनी ताेंडाला कपडा बांधलेला हाेता. दरम्यान, दगडफेक करुन ते नंबरप्लेट नसलेल्या लाल रंगाच्या मोटारसायकलवरुन पासर झाले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली.

९ हजारांचे नुकसान...

बसवर करण्यात आलेल्या दगडफेकीत बसचे जवळपास ९ हजारांचे नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत जयशंकर गुरुलिंग स्वामी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन किल्लारी पोलिस ठाण्यात दाेघा अज्ञाताविराेधज्ञत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमादार गणेश यादव करीत आहेत.

टॅग्स :ST Strikeएसटी संप