शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्या आल्याच्या दहशतीने आठवड्यापासून जागता पहारा, वनविभागाच्या गस्तीत आढळला तरस

By हरी मोकाशे | Updated: May 18, 2024 18:55 IST

आठवड्यापासून वन कर्मचारी आखाड्यावर खडा पहार देत आहेत

लातूर : चाकूर तालुक्यातील शिवणी, शिवणखेडमध्ये बिबट्यासदृश प्राणी दिसल्याने व काही पाऊलखुणा आढळल्याने त्यास जेरबंद करण्यासाठी वन विभागाने दिवसरात्र गस्त सुरू केली आहे. आठवडाभरापासून या शिवारातील आखाड्यावर मुक्काम सुरु केला आहे. मात्र, शनिवारी पहाटे बिबट्या नव्हे तर तरस प्राणी शेतकऱ्यांना आढळला आहे.

चाकूर तालुक्यातील शिवणखेड येथील एका म्हशीच्या वासराचा वन्य प्राण्याने फडशा पाडल्याचे ५ मे रोजी निदर्शनास आले होते. त्याची माहिती नागरिकांनी दिल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, पुन्हा काही शेतकऱ्यांनी बिबट्या दिसल्याची माहिती दिली. त्यावरून वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता बिबट्यासदृश्य प्राण्याच्या पाऊलखुणा आढळल्या. त्याचे ठसे घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले.

९ कर्मचाऱ्यांचा शिवारात खडा पहारा...बिबट्यासदृश्य प्राण्याचा माहितीवरुन ५ मे पासून चाकूरचे एक वनपाल व एक वनरक्षक रात्रंदिवस शिवणी व शिवणखेडच्या शिवारात मुक्कामी आहेत. दरम्यान, ११ मे पासून अहमदपूर, उदगीर, जळकोट येथील तीन वनपाल आणि चार वनरक्षक या शिवाराच्या आखाड्यावर खडा पहारा देत आहेत. शनिवारी पहाटे बिबट्या नव्हे तर तरस प्राणी आढळून आल्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

बिबट्या नव्हे, तरसाचा वावर...शिवणखेड परिसरात शनिवारी पहाटेच्या सुमारास तरस प्राणी आढळून आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरु नये. परंतु, सतर्क रहावे. अशा प्राण्यांच्या अंगावर धावून जाऊ नये. अन्यथा तो प्रतिहल्ला करण्याची भीती अधिक असते. सदरील प्राण्यास लवकरात लवकर पकडून त्याच्या नैसर्गिक अधिकवासात सोडण्यात येईल.- अश्विनी आपेट, वनपरिक्षेत्र अधिकारी.

 

टॅग्स :laturलातूरforest departmentवनविभागAgriculture Sectorशेती क्षेत्रleopardबिबट्या