शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
5
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
6
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
7
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
8
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
9
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
10
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
11
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
12
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
13
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
14
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
15
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
16
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
17
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
18
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
19
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
20
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान

एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर ना पगार मिळताे, ना वैद्यकीय बिले मिळतात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:24 IST

लातूर विभागातील लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा आगारात २ हजार ९०० हजार अधिकारी, कर्मचारीसंख्या आहे. या कर्मचाऱ्यांना महिन्याला ...

लातूर विभागातील लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा आगारात २ हजार ९०० हजार अधिकारी, कर्मचारीसंख्या आहे. या कर्मचाऱ्यांना महिन्याला जवळपास ५ काेटी रुपये वेतनासाठी लागतात. गत दीड वर्षात अनेकदा दाेन ते तीन महिने वेतन थकल्याचा अनुभव कर्मचाऱ्यांच्या पदरी आहे. राज्य शासनाकडून मिळालेल्या आर्थिक मदतीवर कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यात आले आहे. गत महिन्यातही ५०० काेटी राज्य शासनाचे मिळाल्यानंतर जुलै महिन्याचे वेतन महमंडळाला करता आले. सध्याची परिस्थिती हलाखीची, दयनीय आहे.

वैद्यकीय बिले रखडल्याची तक्रार...

महामंडळात कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले गत अनेक महिन्यांपासून रखडली आहेत. अद्यापही त्यांच्या पदरी ही बिले पडली नाहीत. आराेग्यासाठी करण्यात आलेला खर्च आणि त्यासाठी घेण्यात आलेले कर्ज, हातउसने पैशांची कशी परतफेड करायची, हा प्रश्न अनेक कर्मचाऱ्यांना सतावत आहे.

फंड नसल्याने निर्माण झाली अडचण...

महामंडळातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले थकली आहेत, हे वास्तव आहे. मात्र, त्यासाठी असलेला फंड आपल्याकडे सध्याला उपलब्ध नाही. सध्या आर्थिक अडचण आहे. सध्याच्या उत्पन्नात लालपरी प्रवाशांच्या सेवेत धावत आहे. जून २०२० मध्ये डिझेल प्रतिलिटर ५६ रुपये हाेते, तर सप्टेंबर २०२१ मध्ये डिझेल ९५ रुपयांच्या घरात आहे. डिझेलचा दर दुप्पट झाला आहे. अशा स्थितीत महामंडळाचा कारभार चालविणे माेठी कसरत आहे.

- सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक, लातूर.

दाेन महिन्यांनंतर हाेताेय पगार...

काेराेनाकाळात महामंडळाची लालपरी अनेक दिवस जाग्यावरच थांबून हाेती. टप्प्याटप्प्याने प्रवासीसेवा सुरू झाली. मात्र, आर्थिक उत्पन्नाची घडी अद्यापही विस्कटलेलीच आहे.

अशा स्थितीत अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेतनासाठी शासनाच्या मदतीवर अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी, गत दीड महिन्यात अनेकदा वेतन थकले असून, दाेन-तीन महिन्यांनंतर वेतन झाले.

अनेकांना घर चालविणेही अवघड झाले आहे. आराेग्य, शिक्षणावर तर पैसा काेठून खर्च करणार ही चिंता अनेकांच्या चेहऱ्यावर कायम आहे.

उपचारावर झालेला खर्च काेठून आणायचा...

काेराेनाकाळात घरात आई-वडील आणि मुलगा आजारी हाेता. त्यांच्या उपचारासाठी मला पाहुण्यांकडून, मित्रांकडून हातउसने पैसे घ्यावे लागले आहे. आता त्या पैशाची परतफेड मी वेळेवर करू शकत नाही. परिणामी, पत गेली आहे. उपचारावर झालेला खर्च काेठून आणायचा हा प्रश्न मला सतत सतावत आहे. - एक कर्मचारी.

काेराेनाकाळात पत्नीला काेराेनाची बाधा झाली. त्यासाठी तिच्यावर जवळपास दीड ते दाेन लाखांचा खर्च झाला. हा उपचार कर्ज काढून केला आहे. शिवाय, सध्याला हाती वेळेवर पगारही नाही. अशा स्थितीत कुटुंबातील आई-वडील, मुला-बाळांच्या उपचारावर काेठून पैसा खर्च करायचा, हीच चिंता आजही मला सतावत आहे. - एक कर्मचारी.