शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

SSC Result : लातूर विभागीय मंडळाचा निकाल ९९.९६ टक्के; ६१ हजार २८८ विद्यार्थी प्राविण्यासह झाले उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 15:44 IST

SSC Result Latur Division Board : दहावीच्या निकालासाठी शाळास्तरावर शासन निर्णयानुसार निकाल समितीचे गठण करुन त्यांना विषय व वर्ग शिक्षक यांनी केलेल्या मुल्यमापनावर दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला.

ठळक मुद्देउस्मानाबाद जिल्ह्यातून २२ हजार ७३३ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी २२ हजार ७३२ विद्यार्थ्यांचे मुल्यांकन झाले. नांदेड जिल्ह्यात ४७ हजार ३३८ विद्यार्थ्यांची नोंदणी मुल्यांकणासाठी झाली होती. प्रत्यक्ष मुल्यांकन ४७ हजार ३३३ विद्यार्थ्यांचे झाले.

लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर केला असून, त्यामध्ये लातूर विभागीय मंडळाचा ९९.९६ टक्के निकाल लागला आहे. मुल्यमापन केलेल्या १ लाख १० हजार ३४२ विद्यार्थ्यांपैकी ६१ हजार २८८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. श्रेणी- १ मध्ये ३९ हजार ६३७, श्रेणी -२ मध्ये ४ हजार ७३०, पास श्रेणीत ४ हजार १८६ असे एकूण १ लाख ९ हजार ८४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ( Latur Divisional Board's Overall SSC result 99.96 percent )

दहावीच्या निकालासाठी शाळास्तरावर शासन निर्णयानुसार निकाल समितीचे गठण करुन त्यांना विषय व वर्ग शिक्षक यांनी केलेल्या मुल्यमापनावर दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. लातूर जिल्ह्यात दहावीसाठी ४० हजार २८१ विद्यार्थी नोंदणीकृत होते. त्यापैकी ४० हजार २७७ विद्यार्थ्यांचे मुल्यमापन झाले. या मुल्यमापनात २२ हजार ८०६ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तर श्रेणी -१ मध्ये १४ हजार १९१, श्रेणी -२ मध्ये २ हजार ७, पास श्रेणामध्ये १ हजार ११८ असे एकूण ४० हजार १२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.६१ टक्के आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातून २२ हजार ७३३ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी २२ हजार ७३२ विद्यार्थ्यांचे मुल्यांकन झाले. या मुल्यांकनात १२ हजार ४४० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. श्रेणी - १ मध्ये ८ हजार ५७, श्रेणी -२ मध्ये १ हजार ३२४ तर पास श्रेणीत ७८० असे एकूण २२ हजार ६०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.४२ टक्के आहे.

नांदेड जिल्ह्यात ४७ हजार ३३८ विद्यार्थ्यांची नोंदणी मुल्यांकणासाठी झाली होती. प्रत्यक्ष मुल्यांकन ४७ हजार ३३३ विद्यार्थ्यांचे झाले. या मुल्यांकनात २६ हजार ४२ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. श्रेणी -१ मध्ये १७ हजार ३८९, श्रेणी -२ मध्ये १ हजार ३९९ आणि पास श्रेणात २ हजार २८८ असे एकूण ४७ हजार ११८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. नांदेड जिल्ह्याच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९९.५४ टक्के आहे.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालlaturलातूर