सध्या बाजारपेठेत साेयाबीनची आवक घटली आहे. दरम्यान, दरात वाढ झाली आहे. खरीपातील सोयाबीनची शेतक-यांनी काढणी झाल्यानंतर बाजारात विक्री केली होती. तेव्हा कमी भाव पदरात पडला होता. आता हमीभावाच्या दुप्पट दर मिळत असल्याने शेतक-यांचा आर्थिक लाभ होत आहे. दरम्यान, बाजार समितीत हरभ-यांचे दर हमीभावापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे शेतक-यांनी हमीभाव खरेदी केंद्राकडे पाठ फिरवली आहे. परिणामी, खरेदी केंद्र ओस पडले असल्याचे दिसत आहेत. यंदा शेतीमालाचे भाव चांगलेच वधारले असल्यामुळे शेतक-यांत आनंदाचे वातावरण आहे. मात्र, सोयाबीनच्या दरवाढीचा काही शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.
शेतीमालाला चांगला भाव...
औसा बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे आवक वाढली आहे. शेतकऱ्यांसाठी बाजार समितीने यार्डात विविध सुविधा निर्माण केल्या असल्याचे सभापती राजेंद्र भोसले व उपसभापती किशोर जाधव यांनी सांगितले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मार्केट यार्डातील आडते, व्यापारी, खरेदीदार व हमाल- मापाडी यांनी कोविड लस घ्यावी, असे आवाहन बाजार समितीचे सचिव मुस्ताक शेख यांनी केले आहे.