शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उदगीरात सलग दुसऱ्या दिवशीही हत्या

By admin | Updated: May 27, 2016 16:39 IST

उदगीर शहरात गुरुवारी भरदुपारी अज्ञात तिघा चोरट्यांनी एका महिलेची हत्या केल्याच्या वृत्ताची शाई वाळत नाही तोच शुक्रवारी पुन्हा एका व्यवसायिकाची हत्या झाली.

ऑनलाइन लोकमत 

उदगीर, दि. २६ - उदगीर शहरात गुरुवारी भरदुपारी अज्ञात तिघा चोरट्यांनी एका महिलेची हत्या केल्याच्या वृत्ताची शाई वाळत नाही तोच शुक्रवारी पुन्हा एका व्यवसायिकाच्या हत्येने उदगीरात खळबळ उडाली़. सकाळी ११ ते १२ वा़ सुमारास उदगीरनजीकच्या मोरतळ तांडा येथे मनोज काशिनाथ मळगे (वय ३५) या फोटोफ्रेम व्यवसायिकाचा गळा आवळून हत्या झाल्याचे उघडकीस आले़. 

उदगीर येथील मनोज काशिनाथ मळगे यांचा फोटोफ्रेम करण्याचा व्यवसाय होता़ नेहमीप्रमाणे मनोज मळगे हे गुरुवारी आपल्या दुकानकडे गेले होते़ मात्र, रात्री ते परतलेच नाहीत़ त्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा रात्री उशिरापर्यंत शोध घेतला़ सकाळीही ते न परतल्याचे पाहून उदगीर ग्रामीण पोलिसात मनोज मळगे हे हरवल्याची तक्रार दिली़.

या तक्रारीवरुन पोलिस शोध घेत असताना शहरानजीकच्या मोरतळा तांडा येथे एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास पोलिसांना मिळाली़ त्यावरुन पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन चौकशी केली असता सदरील मृतदेह हा मनोज मळगे यांचा असल्याचे निष्पन्न झाले़ मनोज मळगे यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले़आर्थिक देवाणघेवाणीतून घटना?मयत मनोज मळगे यांचे बंधू अ‍ॅड़ महेश मळगे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, एका व्यक्तीकडून मनोजचे ४० हजार रुपये येणे होते़ त्याने ते पैसे गुरुवारी सायंकाळी वसूल केले़ त्याची माहिती त्याच्या सोबतच्या मित्रांना होती़ त्यामुळे ही घटना आर्थिक देवाण- घेवाणीतून घडली असावी, असा संशय व्यक्त केला़

उदगीर बंद़़उदगीर येथील किरणा व्यापारी प्रशांत पेन्सलवार यांच्या पत्नी प्रणिता पेन्सलवार यांचा तीन अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी दुपारी खून केला़ या घटनेच्या निषेधार्थ शहरातील व्यापाऱ्यांनी शुक्रवारी बाजारपेठ बंद ठेवली आहे़