शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले; ४१ वर्षांत १४ वेळा धरण भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:22 IST

धनेगाव येथे मांजरा प्रकल्पाची उभारणी १९८०-८१ मध्ये झाली. त्यानंतर पहिल्यांदा १९८८-८१ मध्ये धरण भरले. सलग तीन वर्षे धरण भरल्याने ...

धनेगाव येथे मांजरा प्रकल्पाची उभारणी १९८०-८१ मध्ये झाली. त्यानंतर पहिल्यांदा १९८८-८१ मध्ये धरण भरले. सलग तीन वर्षे धरण भरल्याने सिंचनाला पाणी सोडण्यात आले होते. १९९१ ते १९९६ पर्यंत सहा वर्षे धरण भरले नाही. परिणामी, लातूर शहरासह प्रस्तुत शहरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. सहा वर्षांच्या खंडानंतर १९९६-९७ मध्ये पुन्हा धरण भरले. त्यानंतरच्या पावसाळ्यामध्ये मात्र धरणात नवीन पाणीसाठा होऊ शकला नाही. मात्र, एक वर्षाच्या खंडानंतर १९९८ मध्ये झालेल्या पावसाळ्यात पुन्हा धरण भरले. सलग पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वर्षे धरण कधीच भरलेले नाही. सलग तीन वर्षे धरण भरल्याची उदाहरणे आहेत. मांजरा प्रकल्पांतर्गत अनेक गावांचा पाणीपुरवठा, तसेच सिंचन असल्यामुळे प्रकल्प क्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस होऊ शकला नाही. त्यामुळे नव्याने पाणीसाठा उपलब्ध होऊ शकला नाही. यंदा मात्र प्रकल्प शंभर टक्के भरल्याने प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून मंगळवारी पाणी सोडून देण्यात आले होते. परंतु, मोठ्या प्रमाणात येवा सुरू असल्याने पाणीसाठा नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असल्याची माहिती शाखा अभियंता शाहूराज पाटील यांनी दिली.

१४ वेळा भरलेल्या पाण्यावर भागविली तहान

१९८० पासून फक्त १४ वेळा धरण भरले आहे. त्यावरच लातूरसह या धरणावर अवलंबून असलेल्या गावांची तहान भागविण्यात आली. २०१६ च्या उन्हाळ्यात तर अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली होती. या टंचाईत रेल्वेने पाणी आणून लातूरकरांची तहान भागवावी लागली होती. त्यांनतर धरणात पिण्याकरता पाणीसाठा झाला. आता सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. यामुळे लातूरला दिलासा मिळाला आहे.

धरण शंभर टक्के भरलेले वर्ष....

१९८८-८९

१९८९-९०

१९९०-९१

१९६-९७

१९९८-९९

२०००-०१

२००५-०६

२००६-०७

२०१०-११

२०११-१२

२०१६-१७

२०१७-१८

२०२०-२१