शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

हल्ल्याच्या निषेधार्थ व्यापा-यांचा मूकमोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:24 IST

७ सप्टेंबर रोजी येथील व्यापारी निकेश मोतीगीर गिरी यांच्यावर गावातील रणजित दिनकर पात्रे व इंद्रजित दिनकर पात्रे यांनी प्राणघातक ...

७ सप्टेंबर रोजी येथील व्यापारी निकेश मोतीगीर गिरी यांच्यावर गावातील रणजित दिनकर पात्रे व इंद्रजित दिनकर पात्रे यांनी प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले. हॉटेल बंद करण्याची वेळ झाली असून मला हॉटेल बंद करावयाचे आहे. त्यामुळे आपण बाहेर जावे, अशी विनंती व्यापारी गिरी यांनी रणजित व इंद्रजित पात्रे यांना केली असता त्यांनी हॉटेलमधून बाहेर जाण्यास नकार देत वाद घातला. त्यात त्यांनी गिरी यांच्या डोक्यात दगडाने जबर मारहाण करुन जखमी केले. दरम्यान, गिरी यांच्या तक्रारीवरून औराद पोलीस ठाण्यात बुधवारी तात्काळ गुन्हा दाखल करुन एका आराेपीस अटक करण्यात आली.

शहरात अशा गावगुंडांचा त्रास छोट्या व गरीब व्यापाऱ्यांना दररोज सहन करावा लागत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यावरील हल्ल्याच्या व गावगुंडाकडून होणाऱ्या दैनंदिन त्रासाच्या विरोधात शनिवारी निषेध मोर्चा काढून व्यापाऱ्यांनी औराद पोलिसांकडे संरक्षणासाठी निवेदन दिले.

मोर्चास छत्रपती शिवाजी महाराज चौकातून प्रारंभ झाला. मोर्चा ठाण्यावर पोहोचल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कामत यांना व्यापाऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी व्यापारी शिवकुमार मंडगे, अर्जुन पाटील, मल्लिकार्जुन लातुरे, बाजार समितीचे सभापती हाजी सराफ, भाजपा तालुकाध्यक्ष शाहुराज थेटे, दिनकर शेटगार, सचिन सोनी, संदीप पाटील, यतिराज झंवर, रमेश थेटे, दीपक थेटे, एकबाल मुल्ला यांच्यासह विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी व व्यापारी उपस्थित होते.

त्रास देणा-यांची तक्रार करावी...

आरोपींच्या विरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला असून एक आरोपी अटकेत आहे. एक फरार आहे. त्याचाही शोध सुरु आहे. गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी गावगुंडांना न घाबरता पोलिसांकडे तक्रार द्यावी. त्रास देणा-यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे औराद शहाजानीचे सपोनि. संदीप कामत म्हणाले.