सकाळी उदगीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी भारत राठोड, सुमन राठोड यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. दुपारी एस.टी. महामंडळाचे उदगीर आगार प्रमुख यशवंत कानतोंडे, वाहतूक नियंत्रक अनिल पळनाटे, जिल्हा परिषदचे कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंद चिलकुरे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील, शंकर रोडगे, कृषी उप-संचालक राजकुमार मोरे, पी.पी. मोरे, सुभाष मोरे, वन परिमंडळ अधिकारी तुकाराम वंजे, राम मोतीपवळे, माधव रोडगे, बसवेश्वर डावळे, ग्रामविकास अधिकारी बब्रुवान पाटील, महाडोळे, धनंजय गुडसुरकर, मधुसूदन गुडसुरकर, मयुर कुलकर्णी, सुनंदा सरदार, माधुरी कुलकर्णी यांच्या हस्ते आरती, पूजा करण्यात आली. हत्तीबेटावरील सद्गुरू गंगारामबुवा महाराज, श्री दत्तात्रेय, श्री स्वामी समर्थ, बालाजीचे भाविकांनी माेठ्या संख्येने दर्शन घेतले. उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या सोहळ्यासाठी व्ही. एस. कुलकर्णी, गंगाधर गोसावी, भानुदास फुलवाड, विठ्ठल सूर्यवंशी यांनी पुढाकार घेतला.
हत्तीबेटावर श्री दत्त जयंती सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:20 IST