पालकमंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत ऑनलाईन कोविड आढावा बैठक
लातूर : राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख ६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मुंबई मंत्रालय येथून कोविड-१९ बाबत ऑनलाईन व्हिसीद्वारे आढावा बैठक घेणार आहेत.
बैठकीला महापौर विक्रांत गोजमगुंडे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, मनपा आयुक्त अमन मित्तल अधिष्ठाता डॉ. सुधाकर देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. गंगाधर परगे यांची उपस्थिती राहणार आहे.
क्लस्टर अंतर्गत प्राचार्यांची बैठक
लातूर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत क्लस्टर हेडची दयानंद कला महाविद्यालयात सोमवारी बैठक झाली. या बैठकीला तालुक्यातील सर्व प्राचार्य उपस्थित होते. या बैठकीमध्ये विद्यापीठ परीक्षेसंदर्भात चर्चा करण्यात आली. ऑनलाईन बैठकीत प्राचार्य डॉ. एस. आर. अवस्थी, प्राचार्य डॉ. अजय पाटील, प्राचार्य डॉ. संजय वाघमारे, प्राचार्य डॉ. संग्राम मोरे, प्राचार्य डॉ. बेटकर, प्राचार्य डॉ. जहागीरदार, प्राचार्य डॉ. राम बोरगावरक, प्राचार्य डॉ. जाधव आदींनी मते मांडली. बैठकीला प्राचार्य डॉ. एस. पी. गायकवाड, क्लस्टर समन्वयक डॉ. बी. टी. घुटे, परीक्षा केंद्र प्रमुख डॉ. अंजली जोशी, डॉ. एस. एन. कदम, डॉ. संतोष पाटील, डॉ. शिवकुमार राऊतराव आदींची उपस्थिती होती.