शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लाइक, शेअर, फाॅरवर्ड जरा जपून; खावी लागू शकते तुरुंगाची हवा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:24 IST

आता प्रत्येकाला आपल्या हाती असलेला स्मार्टफाेन, संगणक अतिशय काळजीपूर्वक वापरण्याची गरज आहे. साेशल मीडियामध्ये माेठ्या प्रमाणावर बनावट मेसेज व्हायरल ...

आता प्रत्येकाला आपल्या हाती असलेला स्मार्टफाेन, संगणक अतिशय काळजीपूर्वक वापरण्याची गरज आहे. साेशल मीडियामध्ये माेठ्या प्रमाणावर बनावट मेसेज व्हायरल केले जात आहेत. यातून दाेन समाजात तेढ निर्माण हाेणे, एखाद्याची जाणीवपूर्वक बदनामी करणे, फसवणूक करण्याचे प्रकार झाले आहेत. या सर्व हालचालींवर सायबर सेलची करडी नजर आहे.

साेशल मीडियाचा वापर करा सांभाळून...

शालेय, महाविद्यालयीन मुला-मुलींसह सर्वच नागरिकांनी साेशल मीडियाचा वापर सांभाळून करण्याची गरज आहे.

आपल्या व्हाॅटस्ॲप, फेसबुक, ट्विटरवर आलेल्या मेसेजची खातरजमा करून घ्यावी, त्यानंतरच लाइक, शेअर आणि फाॅरवर्डचा निर्णय घ्यावा.

अशी घ्या काळजी...

एखाद्या व्हाॅटस्ॲप ग्रुपमध्ये आपला माेबाइल नंबर समाविष्ट केल्यानंतर ताे ग्रुप काेण चालविताे, त्यातील इतर व्यक्ती काेण आहेत, याची शहानिशा करण्याची गरज आहे.

आपल्याला बनावट खात्यावरून कुठला मेसेज येत नाही ना, याची चाैकशी, खातरजमा करावी. यातून आपली फसवणूक हाेण्याची शक्यता अधिक असते.

विविध स्वरूपाचे मेसेज, फाेटाे दिवसभरात येतात. यावेळी याची सत्यता पडताळूनच त्यांना लाइक, शेअर आणि फाॅरवर्ड करण्याचा निर्णय घ्यावा.

मुलींनाे डीपी सांभाळा...

व्हाॅटस्ॲप, फेसबुक आणि इतर साेशल मीडिया वापरताना मुलींनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. डीपीवर आपला फाेटा ठेवत असाल तर सावधानता बाळगली पाहिजे. आपल्या फाेटाेचा गैरवापर हाेण्याची अधिक शक्यता असते. यासाठी सांकेतिक फाेटाे डीपीला ठेवावा. ठेवलाच तर ताे डीपी लाॅक करावा, ज्यातून तुमचा फाेटाे काेणी डाऊनलाेड करणार नाही. साेशल मीडियात माेठ्या प्रमाणावर बनावट खाते उघडून अनेकांची फसवणूक केली जात असल्याचे समाेर आले आहे.

साेशल मीडियावर बदनामी, अनेकांवर गुन्हे दाखल...

साेशल मीडियामध्ये ठरवून एखाद्याला बदनाम करणे, त्याबाबत चुकीच्या पाेस्ट, फाेटाे आणि माहिती व्हायरल करणे, सतत त्यांची बदनामी हाेईल, अशा प्रकारे मेसेज व्हायरल केल्याप्रकरणी अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातून सायबर सेल आणि त्या-त्या पाेलीस ठाण्यांच्या प्रमुखांची करडी नजर आहे. दाेन समाजांत तेढ निर्माण हाेईल असे मेसेज व्हायरल केल्याप्रकरणीही गुन्हे दाखल आहेत.

आक्षेपार्ह पाेस्टबाबत संपर्क करा...

साेशल मीडियात एखादी आक्षेपार्ह पाेस्ट व्हायरल हाेत असेल, संशयास्पद वाटत असेल तर नागरिकांनी तातडीने सायबर सेल अथवा संबंधित जवळच्या पाेलीस ठाण्याशी संपर्क साधावा. अनेकदा एखाद्या बनावट मेसेज, लिंकमधून फसवणूक हाेण्याची अधिक शक्यता हाेते. यासाठी नागरिकांनी दक्षता बाळगण्याची गरज आहे.

- निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक, लातूर