शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

नागरी आरोग्य केंद्रातही मिळणार आता तज्ज्ञ डॉक्टरांकडून सेवा

By हरी मोकाशे | Updated: October 27, 2023 19:51 IST

गोरगरिबांना दिलासा : उदगीरमध्ये पॉलिक्लिनिक सेवा सुरू

लातूर : झोपडपट्टी, आर्थिक मागास, मजूर वस्तीतील रुग्णांच्या आजाराचे तत्काळ निदान होऊन वेळेवर उपचार मिळावेत म्हणून उदगीरमधील तळीवेस भागात पॉलिक्लिनिक सेवा सुरु करण्यात आली आहे. तिथे सहा आजारांचे तज्ज्ञ डॉक्टर आठवड्यातून एक दिवस आरोग्य सेवा देणार आहेत.

उदगीर शहरात दोन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, दोन वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील आरोग्य सेवा दिल्या जातात. दरम्यान, जिल्ह्यातील दोन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा उंचावून तिथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या सुविधा देण्याच्या सूचना राज्य शासनाने केल्या. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तज्ज्ञ डॉक्टरांच्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आणि उदगीरमधील तळीवेस भागात पॉलिक्लिनिक सेवेस प्रारंभ करण्यात आला.

यावेळी उपविभागीय अधिकारी शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच.व्ही. वडगावे, तहसीलदार रामेश्वर गोरे, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत कापसे, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय महिंद्रकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. रमन येनालडले, डॉ. भोसले, डॉ. पवार, डॉ. मुसणे आदी उपस्थित होते.

स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ करणार तपासणी...उदगीरमधील तळीवेस भागातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा उंचावण्यात आला आहे. तिथे प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवांबरोबरच गंभीर आजाराचे लवकर निदान व्हावे म्हणून सहा तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, कान- नाक- घसा तज्ज्ञ, नेत्र तज्ज्ञ, मानसोपचार, त्वचारोग तज्ज्ञ आहेत. ते आठवड्यातून एक दिवस रुग्णांची तपासणी करुन उपचार करणार आहेत.

लवकर निदान होण्यास मदत...तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती ही स्त्री रुग्णालय, सामान्य रुग्णालय, उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयात असते. आता उदगीरच्या तळीवेस भागातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातही सहा तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना तत्काळ सेवा मिळण्यास मदत होणार आहे. शिवाय, सामान्य रुग्णालयावरील काहीसा ताण कमी होणार आहे. या केंद्रातून संदर्भसेवाही पुरविण्यात येणार आहेत. सामान्य रुग्णांसाठी हे हक्काचे क्लिनिक असणार आहे.- डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

टॅग्स :laturलातूरhospitalहॉस्पिटल