लसीकरणासाठी जनजागृती
खासगी लसीकरण केंद्रामध्ये अडीचशे रुपये, र सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत लस देण्यात येत आहे. लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून वेगवेगळ्या विभागांतील जवळपास सर्वच प्रमुखांनी लस घेतली आहे. लस घ्या, सुरक्षित राहा असा संदेश दिला जात आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता लस घेतलेल्या नागरिकांनीही मास्क, फिजिकल डिस्टन्स आणि सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात येत आहे.
जिल्हा ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, वैद्यकीय महाविद्यालय, मांजरा आयुर्वेद महाविद्यालयासह जिल्ह्यात ७५ केंद्रांवर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. ऑनलाइन नोंदणी तसेच ६० वर्षांच्या पुढील ज्येष्ठ नागरिकांना व इतर आजारी असलेल्या नागरिकांना ऑनलाइन, ऑफलाइन दोन्हीही सुविधा उपलब्ध आहेत. नोंदणी केल्यानंतर त्यांना लस दिली जात आहे.