वलांडी येथील प्रगतशील शेतकरी सुरेंद्र काशिनाथ अंबुलगे यांच्या शेतीत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाशा पटेल यांनी बांबू लागवड विषयी मार्गदर्शन केले. विशेषतः बांबूचे झाड शीघ्र गतीने वाढणारे जगातील एकमेव झाड असून पावसाळ्यात बाबूंच्या झाडाची दररोज एक फुट वाढ होत आहे. दरवर्षी एका व्यक्तीला जितका ऑक्सिजन लागतो त्यापेक्षा अधिक ऑक्सिजन एक बाबूंचा झाड देतो. आपल्या परिसरात ऑक्सिजनची वाढ ही काळाची गरज आहे. आगामी काळात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांंबूची शेती करावी असे आवाहन शेतकरी नेते पाशा पटेल यांनी केले. यावेळी माजी आमदार धर्माजी सोनकावडे, उद्योजक आनंद पाटील, माजी सरपंच राम भंडारे, तालुका कृषी अधिकारी शिरीष धनबहादूर, कृषी सहायक राहुल जाधव, सुरेंद्र अंबुलगे, माधवराव कवठाळे, शशीकांत शिंदे, उद्धव तवडे, महेश सजनशेट्टे, प्रभू लाटे, विठ्ठल महानुरे, संगमेश्वर स्वामी, यासीन मुर्शेद, मैनोद्दीन मुर्शेद, अक्रम शेख, भगवान बोचरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन नरेश बिरादार यांनी केले.
वलांडी येथे शेतीविषयक चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:13 IST