महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात महिला दिन
लातूर : येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या सुनीता आरळीकर यांनी मार्गदर्शन केले. शिक्षणातून महिलांमध्ये संघर्षावर मात करण्याचे सामर्थ्य पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे, सुनीता चोपणे, प्रा. मनोहर कबाडे, प्रा. वनिता पाटील, डॉ. शीतल येरुळे, मंगल आग्रे, डॉ. श्रद्धा अवस्थी, डॉ. उमा कडगे, प्रा. मिनाक्षी निला, प्रा. वैशाली जयशेट्टे, प्रा. रुपाली हलवाई, प्रा. कल्पना गिराम, प्रा.जयश्री पाटील, प्रा. परमेश्वर पाटील यांची उपस्थिती होती.
महिला दिनानिमित्त बक्षिसांचे वितरण
लातूर : जागतिक महिला दिनानिमित्त क्रीडा संकुल येथे धावणे स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे इंजिनिअर असोसिएशनच्या वतीने बक्षीस वितरण करण्यात आले. यामध्ये रुपाली भोसले, गंगाधर बिराजदार, शंकर लांडगे, विकास कातपुरे यांनी यश मिळविले. यावेळी अध्यक्ष अभिजीत देशपांडे सरसंबेकर, उपाध्यक्ष धर्मवीर भारती, अरिहंत जंगमे, विनोद उदगीरकर, मनोज देशमुख, वामन पाटील, नितीन मंडाले, सचिन हिसवणकर, अमोल सेलूकर, वसिम शेख, अहमद मुल्ला आदींसह इंजिनिअर असोसिएशनच्या सदस्यांची उपस्थिती होती.
महिला दिनानिमित्त कामगारांचा गौरव
लातूर : जागतिक महिला दिनानिमित्त महानगरपालिका व जनाधार सेवाभावी संस्थेच्या वतीने स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. यावेळी सहायक आयुक्त मंजुषा गुरमे, जनाधार सेवाभावी संस्थेच्या मानसी कुलकर्णी, स्वच्छता निरीक्षक हिरालाल कांबळे, मनोज शिंदे आदींसह स्वच्छता कर्मचारी तसेच मनपाच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. लातूर शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी प्रबोधन करण्याचे काम स्वच्छताताई करतात. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून महिला दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.
जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला वेग
लातूर : कोरोना लसीकरण मोहिमेला जिल्ह्यात वेग आला आहे. सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर लसीकरण मोहीम राबविली जात आहे. ज्येष्ठ नागरिकही यामध्ये सहभाग नोंदवीत आहेत. शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आरोग्य कर्मचाऱ्यांसह नागरिकांना लस दिली जात आहे. यासाठी नोंदणी आवश्यक असून, संदेश प्राप्त होतील, त्यांना लस दिली जात आहे.
वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त
लातूर : एमआयडीसी परिसरातील पाच नंबर चौकात वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. सायंकाळच्या वेळी वाहतुकीची कोंडी होत असून, वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या चौकातील सिग्नलही बंद असल्याने सिग्नल दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. अवजड वाहनांची रेलचेल असल्याने अपघाताचा धोका आहे. याकडे शहर वाहतूक शाखेने लक्ष देण्याची मागणी होत आहे.