अध्यासी अधिकारी नाथराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीच्या नूतन सदस्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी सरपंच पदासाठी जय मल्हार ग्रामविकास पॅनलच्या प्रमुख सारिका नंदगावे व लक्ष्मीबाई मल्लिशे यांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे मतदान घेण्यात आले. त्यात नंदगावे यांना ५ तर मल्लिशे यांना त्यापेक्षा कमी मते मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सारिका नंदगावे विजयी झाल्याचे घोषित केले. तसेच उपसरपंचपदासाठी संतोष चिंचोळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
यावेळी सदस्या मीराबाई तुकाराम वागलगावे, मनिषा शिवाजी वागलगावे, मारोती वागलगावे, बब्रुवान वागलगावे, बाबूराव वागलगावे, रघु मल्लिशे, प्रभाकर वागलगावे, मच्छिंद्र चिंचोळे, साधू वागलगावे, संपत वागलगावे, उत्तम वागलगावे, डिगांबर नंदगावे, गुरुनाथ वागलगावे, मधुकर काळे, पुंडलिक सुरवसे, गंगाधर वागलगावे, पंडित नंदगावे, ओमप्रकाश नंदगावे, शिमूर्ती वागलगावे, उत्तम वागलगावे आदींची उपस्थिती होती. सरपंच सारिका नंदगावे या राचन्नावाडीच्या माजी उपसरपंच होत्या. त्यांना सरपंचपदाची संधी मिळाली आहे.