यानुसार देवणी तालुक्यातील होनाळी येथील सरस्वती माध्यमिक विद्यालय २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात तालुक्यात पहिली तंबाखूमुक्त शाळा ठरली आहे. भारत सरकारच्या आरोग्य विभागाकडून पारित केलेले नवीन नऊ निकष हे तंबाखूमुक्त आरोग्यसंपन्न मुले होण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरत आहेत. शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने या सुधारित नऊ निकषांना पूर्ण करण्यासाठी पत्र काढले होते. या पत्राच्या आधारे सलाम मुंबई फाऊंडेशनच्या जिल्हा समन्वयक शुभांगी लाड, राहुल खरात, मुख्याध्यापक माधव काकनाळे, सुशील पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक सुधीर साबणे यांनी नवीन निकषानुसार तंबाखूमुक्त अभिमान राबविले. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सरपंच सतीश बिरादार, उपसरपंच औदुंबर पांचाळ, धोंडिबा बिरादार, सुभाष बिराजदार, सुनील पाटील, गंगाधर बिरादार, राजकुमार देशमुख, दीपक इंद्राळे यांच्यासह शाळेतील विद्यार्थ्यांनी अधिक परिश्रम घेतले.
या यशाबद्दल माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर मोरे, देवणीचे गटशिक्षणाधिकारी व्यंकटराव बोईनवाड, शिक्षण विस्ताराधिकारी सूर्यकांत येडले, गट समन्वयक सदाशिव साबणे, सावरगावचे केंद्रप्रमुख विजयकुमार चव्हाण, राजेंद्र वजनम, राजकुमार जाधव, प्रवीण डोईजोडे, विष्णू मोरे, आबासाहेब भद्रे, दीपक बोडके यांनी काैतुक केले आहे.