शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दहा कोटींच्या फसवणूक प्रकरणी बॅकेतील तीन कोटीची रक्कम गोठवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:21 IST

पाेलिसांनी सांगितले, लातूर येथील फिनाॅमिनल हेल्थ केअर कंपनीच्या चालकाने लातूर शहरासह जिल्ह्यातील जवळपास दाेन हजार नागरिकांना रक्कम गुंतविल्यास निर्धारित ...

पाेलिसांनी सांगितले, लातूर येथील फिनाॅमिनल हेल्थ केअर कंपनीच्या चालकाने लातूर शहरासह जिल्ह्यातील जवळपास दाेन हजार नागरिकांना रक्कम गुंतविल्यास निर्धारित वेळेत दामदुप्पट दिली जाणार आहे. शिवाय, आराेग्याच्या सवलती देण्यात येतील, माेफत उपचार करण्यात येणार आहेत, अशी बतावणी करुन जवळपास १० काेटी रुपयांना फसविल्याप्रकरणी २०१८ मध्ये शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. दरम्यान, याप्रकरणी काही संचालकांना अटक करण्यात आली. मात्र, प्रमुख आराेपी असलेला कंपनीचा चेअरमन नंदलाल ठाकूर हा फरार हाेता. त्यांच्याविराेधात लूकऑउट नाेटीस जारी करण्यात आली हाेती. मुंबई येथील विमानतळावरुन त्याला अटक करुन लातुरात आणण्यात आले. लातूर न्यायालयाने त्याला दहा दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे. सध्या ताे लातूर येथील शिवाजीनगर ठाण्याच्या काेठडीत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने चेअरमन नंदलाल ठाकूर आणि त्याच्या मुलाने विविध बॅक खात्यातील आणि वेगवेगळ्या खात्यावर वळविलेली ३ काेटी ५ लाखांची रक्कम गाेठविण्याची कारवाई केली आहे. फिनाॅमिनल कंपनीचा चेअरमन याने न विकलेल्या आणि घेवून न गेलेल्या मालमत्तांचा शाेध घेतला जात आहे. त्याचबराेबर नंदलाल ठाकूर आणि मुलगा सितारा ठाकूर यांच्या वेगवेगळ्या खात्यातील रक्कम गाेठविण्याबाबतचे कायदेशीर प्रक्रिया आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आली आहे. आता या कंपनीच्या मालमत्तावरही टाच आणण्यात आली आहे. फसवणूक झालेल्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे पाेलीस निरीक्षक बालाजी माेहिते यांनी सांगितले.

फरार संचालकांच्या मागावर पाेलीस...

फिनाॅमिनल हेल्थ केअर कंपनीच्या चेअरमनसह इतर २२ संचालकांविराेधात लातुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता यातील फरार असलेल्या संचालकांच्या मागावर पाेलीस आहेत. एका-एका माशाला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कंपनीच्या चेअरमनच्या मुसक्या मुंबई येथील विमानतळावरुन आवळल्या आहेत. यामध्ये बहुतांश संचालक म्हणून नंदलाल ठाकूर यांच्या जवळच्याच नातेवाईकांचा समावेश असल्याचे तपासामध्ये समाेर आले आहे. या संचालकमंडळाने संगनमत करुन विविध आमिष दाखवत गुंतवणूकदारांना फसविल्याचे पुढे आले आहे.