निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे आयाेजित पाेलीस पाटलांच्या बैठकीत ते बाेलत हाेते. यावेळी उपविभागीय पाेलीस अधिकारी डाॅ. दिनेशकुमार काेल्हे, सहायक पाेलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी, पाेलीस पाटील भाऊसाहेब पाटील, विजय प्रकाश डोंगरे, बालाजी पाटील, ओमकार स्वामी यांच्यासह विविध गावचे पाेलीस पाटील उपस्थित हाेते.
पाेलीस अधीक्षक पिंगळे म्हणाले, आजही ग्रामीण भागात काही लाेक अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात. एखाद्या गावात घडलेली मोठी घटना गावातच मिटविण्याचा प्रयत्न करतात. असे न करता संबंधित पोलीस प्रशासन, ठाण्यांना पोलीस पाटलांनी कळविले पाहिजे. यावेळी पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पोलीस पाटील यांच्या समस्या जाणून घेतल्या. ज्या गावात पाेलीस पाटलाचे पद रिक्त आहे, त्या गावात पोलीस पाटील निवडीसाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करू, असे ते म्हणाले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पोलीस ठाण्यासाठी नियोजित असलेल्या बांधकाम जागेची पाहणी केली. सदर ठिकाणी सुसज्ज पोलीस ठाणे उभारू, असेही ते म्हणाले. यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. यावेळी पाेलीस अधीक्षक यांची व्यापारी, नागरिकांनी भेट घेवून आपल्या समस्या मांडल्या. त्या दूर करण्यात येतील, असेही पाेलीस अधीक्षक म्हणाले.