शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

उदगीर तालुक्यात नदी-नाले वाहू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST

शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला पोळा सण उत्साहात साजरा झाल्यानंतर रात्री संपूर्ण तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. हवामान ...

शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला पोळा सण उत्साहात साजरा झाल्यानंतर रात्री संपूर्ण तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज तंतोतंत खरा ठरत असल्याचे या पावसावरून दिसून आले. सोमवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस दुपारी चार वाजेपर्यंत शहरात व तालुक्यात सर्वच भागात कमी-जास्त प्रमाणात होता. शहरातील अनेक सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचले होते, तर शहरातील नाल्या तुंबलेल्या दिसून आल्या. त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले. ग्रामीण भागातील शेतात ठिकठिकाणी पाणी साचले होते. रात्रभर अधूनमधून पडत असलेल्या या पावसामुळे तालुक्यातील सर्वच नदी-नाल्यांना पाणी आले असून या जोरदार झालेल्या पावसाने ते पाणी खळखळून वाहत आहे. तालुक्यातील तोंडार, नेत्रगाव, देवर्जन भागात मोठा पाऊस झाला आहे. या पावसामुळे तालुक्यातील सर्वच तलावाच्या पाणीपातळी वाढ होण्यास मदत झाली आहे; परंतु सोबतच तोडणीसाठी आलेले उडीद व मुगाच्या शेंगाला आता कोंब फुटू लागले आहेत. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे जर अशा प्रमाणात पाऊस पडत गेला तर सोयाबीनच्या पिकालासुद्धा धोका निर्माण होऊ शकतो, असे शेतकरी सांगत आहेत.

उदगीर तालुक्यात आतापर्यंत मंडळनिहाय पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे : कंसातील आकडे आतापर्यंत पडलेल्या पावसाची नोंद दर्शवतात. उदगीर २३(८२७), नागलगाव २० (६६२), मोघा २८ ( ८१५), हेर २३(६९२), वाढवणा ११ ( ८०८), नळगीर २० ( ८५२), देवर्जन ५३ (६९६), तोंडार ३० (६८९), मंगळवारी सकाळपर्यंत तालुक्यात सरासरी २६ मि.मी. इतका पाऊस झाला, तर आतापर्यंत एकूण ७५५ मि.मी. एवढा पाऊस पडला आहे.