शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संधिवातीचा विळखा वाढतोय; महिलांमध्ये प्रमाण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 19:19 IST

यावर नियंत्रणासाठी सकस आहार आणि व्यायाम आवश्यक असल्याचा दावा वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे़ 

ठळक मुद्देआहारात प्रोटिनची कमतरता भासत असल्याने जवळपास १५ ते २० टक्के लोकांना संधी वातीचा त्रास आहे़ संधिवातीचे अनेक प्रकार आहेत़ ती कोणत्याही वयात होऊ शकते़

- आशपाक पठाण  

लातूर : आहारात कार्बोहायड्रेटचे अधिक प्रमाण , खाली बसून जेवणाची पध्दत, व्यायामाचा अभाव आदी कारणामुळे संधिवातीचा त्रास लवकर सुरू होतो़ आहारात प्रोटिनची कमतरता भासत असल्याने जवळपास १५ ते २० टक्के लोकांना संधी वातीचा त्रास आहे़ यावर नियंत्रणासाठी सकस आहार आणि व्यायाम आवश्यक असल्याचा दावा वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे़ 

१२ आॅक्टोबर हा दिवस जागतिक संधिवात दिवस म्हणून साजरा केला जातो़ भारतात रक्तातील वातीचे प्रमाण १३ ते २० टक्के आहे तर वयोमानानुसार होणा-या वातीचे प्रमाण जवळपास ५० टक्के आहे़ हा आजार बरा होत नाही, अशा अनेक गैरसमजुती आहेत़ परंतु अद्ययावत उपचार पध्दती व नवनवीन औषधींचा शोध लागल्याने याला आळा घालता येणे शक्य आहे़

औषधी महागडी असली तरी रूग्णांना दिलासा मिळतो़ संधिवातीचे अनेक प्रकार आहेत़ ती कोणत्याही वयात होऊ शकते़ याचे प्रमाण महिलांमध्ये सर्वाधिक असून अनेक रूग्णांमध्ये संधिवातीचे ठोस कारणही सापडत नाही़ काहींना हा आजार अनुवंशिक किंवा जनुकीय बदलामुळे होत असल्याचे समोर आले आहे़ विशिष्ट जंतूसंसर्ग किंवा विषाणूमुळे संधिवात होते़ धुम्रपान, अनियमित आहार, व्यायामाचा अभाव यातून आजाराला बळ मिळत आहे, असे संधिवात तज्ज्ञ डॉ़ सूरज धूत, डॉ़ अशोक पोदार यांनी सांगितले़  

योग्य वेळी उपचार आवश्यक़़नेहमी सांधे किंवा मांसपेशी दुखणे, सांधे आकडे, सूज येणे, शरीरावर वारंवार पुरळ येणे, वारंवार गर्भपात, थकवा जाणवणे, त्वचा जड पडणे, थंडीमुळे सांधे दुखणे, त्वचा कोरडी पडणे आदी लक्षणे ही संधिवातीची आहेत़ त्यामुळे रूग्णांनी तातडीने वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार घेणे आवश्यक आहे़ संधिवातीवर उपचार करण्यासाठी संशोधन करून औषधी निर्माण करण्यात येत आहे़ या औषधांमुळे रूग्णांना दिलासा मिळतो, असे डॉ़ सूरज धूत यांनी सांगितले़ 

थंडीपासून बचाव महत्वाचा़ वातीचे प्रमाण महिलांमध्ये जास्त आहे़ उपचारात नवीन तंत्रज्ञान आले आहे़ औषधी महागडी असून यातून रूग्णांना लवकर दिलासा मिळतो़ वातावरणातील बदलाचा परिणाम संधिवातीच्या रूग्णांवर होतो़ हिवाळ्यात अशा रूग्णांना जास्त त्रास होतो़ त्यामुळे रूग्णांनी बचावासाठी उबदार कपडे परिधान करावेत़ नवीन तंत्रज्ञानामुळे रोगनिदान सोपे झाले आहे़ रूग्णांनी योग्य वेळी उपचार घेणे महत्वाचे आहे, असे डॉ़ अशोक पोदार यांनी सांगितले़

टॅग्स :laturलातूरmedicineऔषधंhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर