शेतीशाळा प्रात्यक्षिके यासह शासन योजना प्रभावीपणे राबवून अत्यंत कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न राहणार आहे.
शेतीमध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याबरोबर त्याचा प्रसार अधिक प्रमाणात करणार आहोत. एसआरटी, सीआरटी अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वापर करावा यासाठी विशेष प्रयत्न करणार आहोत.
गट शेती समूह शेतीवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाची थेट विक्री करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक नफा मिळेल याशिवाय शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेती उत्पादनावर प्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले जाणार आहे.
कास्ती कोथिंबीर, पठाडी, चिंच, बोरसुरी डाळ यांना भौगोलिक मानांकन प्राप्त करून देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केला जाणार आहेत.
- दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.
......................................
सीईओचा संकल्प
कोरोनाच्या संकटात २०२० हे वर्ष गेले. नवीन वर्षात पुन्हा कोरोनाचे संकट राहणार की नाही, हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीत आरोग्य शिक्षण आणि अंगणवाडी यांचा दर्जा अधिक सुधारण्यासाठी आणि बळकटीकरणासाठी विशेष लक्ष केंद्रित करणार आहेत.
जिल्हा परिषदेंतर्गतचे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातून अधिकाधिक आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी बळकटीकरणाचा संकल्प आहे.
जिल्हा परिषदेच्या वतीने अंगणवाड्यांचे सक्षमीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. अंगणवाड्यांचे मूल्यांकन करून हॅप्पी होमच्या माध्यमातून रंगरंगोटी खेळाचे साहित्य व लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न राहणार आहे, तसेच कुपोषण निर्मूलनावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढावी तसेच पटसंख्या टिकावी यासाठी बाला उपक्रम प्रभावीपणे राबविला जाणार आहे. प्रत्येक शाळेत हा या उपक्रमावर भर दिला जाणार आहे.
- अभिनव गोयल, सीईओ जिल्हा परिषद.