शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

पंचायत समितीचे आरक्षण जाहीर

By admin | Updated: August 26, 2014 00:19 IST

लातूर : लातूर जिल्ह्यातील दहा पंचायत समितीच्या विद्यमान सभापती व उपसभापतींचा कार्यकाळ येत्या सप्टेंबर महिन्यात संपत आहे़

लातूर : लातूर जिल्ह्यातील दहा पंचायत समितीच्या विद्यमान सभापती व उपसभापतींचा कार्यकाळ येत्या सप्टेंबर महिन्यात संपत आहे़ दरम्यान, अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय इमारतीच्या नियोजन समितीच्या सभागृहात सोमवारी आरक्षणाची सोडत करण्यात आली़ त्यात लातूर पंचायत समितीचे सभापतीपद अनुसुचित जातीसाठी आरक्षित झाले असून चाकूर, अहदपूर पंचायत समितीचे सभापतीपद खुल्या प्रवर्गासाठी सुटले आहे़अप्पर जिल्हाधिकारी पुरूषोत्तम पाटोदेकर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या सभापतीपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली़ शिवरी लिंबराज हजारे या दहा वर्षाच्या मुलाकडून चिठ्ठ्या काढून ही सोडत काढण्यात आली़ यावेळी लातूर अनुसुचित जातीसाठी, औसा-महिला, निलंगा-महिला, रेणापूर- नागरिकांचा मागास प्रवर्ग, उदगीर- नागरिकांचा मागास प्रवर्ग, चाकूर- खुला प्रवर्ग, शिरूर अनंतपाळ- अनुसुचित जाती महिला, देवणी- नागरिकांचा मागास प्रवर्ग, जळकोट- सर्वसाधारण महिला, अहमदपूर- खुला प्रवर्गासाठी पंचायत समितीच्या सभापतीपदाचे आरक्षण जाहिर झाले आहे़ यावेळी निवासी उपजिल्हाकारी विश्वंभर गावंडे, उपजिल्हाधिकारी डॉ़ अनंत गव्हाणे, उपविभागीय अधिकारी डॉ़ प्रताप काळे, तहसीलदार रूपाली चौैगुले, पेशकार विजय कांबळे आदींची उपस्थिती होती़ भातांगळी गणातील काँग्रेसचे भालेराव अनुसुचित जाती प्रगर्वातील एकमेव पुरूष पंचायत समिती सदस्य आहेत़ या पंचायत समितीत काँग्रेसचे वर्चस्व असल्याने आरक्षणाची सोडत जाहिर होताच रावसाहेब भालेराव यांना अनेकांनी भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा दिल्या़ तसेच काहींनी प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले़ (प्रतिनिधी)लातूर-अनुसुचित जाती, औसा, निलंगा- महिला, उदगीर, देवणी, रेणापूर- नागरिकांचा मागास प्रवर्ग, शिरूर अनंतपाळ- अनुसुचित जाती महिला, अहमदपूर, चाकूर- खुला प्रवर्ग, जळकोट-सर्वसाधारण महिला़ ४सध्याचे आरक्षण- लातूर पंचायत समितीचे सभापतीपद खुल्या प्रवर्गातील महिला, औसा- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, चाकूर, निलंगा- नागरिकांचा मागास प्रवर्ग, रेणापूर- खुल्या प्रवर्ग महिला, उदगीर- अनुसुचित जाती, देवणी, शिरूरअनंतपाळ- खुला प्रवर्ग, जळकोट- अनुसुचित जाती महिला, अहमदपूर- खुला प्रवर्ग महिला़आरक्षणाची सोडत जाहीर होताच इच्छुकांनी सभापती व उपसभापतीपद मिळविण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे़ लातूर पंचायत समिती अनुसुचित जातीला जाहीर झाले आहे़ लातूर पंचायत समितीच्या भातांगळी गणातून निवडून आलेले रावसाहेब भालेराव हे एकमेव आहेत़ त्यामुळे त्यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडण्याची दाट शक्यता आहे़ यदाकदाचित महिलेला संधी दिल्यास कव्हा व तांदुळजा, भातांगळी गणातून स्पर्धा होईल़