बांबू लागवड शेतीवर कार्यशाळेचे आयोजन
लातूर : बांबू शेती या विषयावर ऑनलाईन वेबिनारचे ५ मे रोजी आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत वेबिनार होणार असून, यावेळी राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल, डाॅ. सलिम रजा, डाॅ. अजय ठाकूर, संजीव करपे, डाॅ. संजय देशमुख यांची उपस्थिती राहणार आहे. सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला उपस्थित राहणार आहेत.
पाच नंबर चौकात वाहनांची तपासणी
लातूर : संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने रात्रीच्या वेळी पाच नंबर चौकात वाहनांची तपासणी मोहीम राबविली जात आहे. तसेच शहरातील विविध भागात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे. शहरातील गांधी चौक, दयानंद गेट परिसर, अंबाजोगाई रोड, रेणापूर नाका आदी परिसरात तपासणी केली जात आहे. नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.